कोरोना विषाणूची दुसरी लाट भयंकर खतरनाक वाटतेय. लॉकडाऊन दरम्यान सगळेच जण, सेलिब्रिटीजसुद्धा, घरातच बसून होते. परंतु भविष्याची आर्थिक चिंता आणि कोरोना विषाणूच्या जीवघेण्या प्रभावाला मनावर न घेणं यामुळे शासनाने लोकांच्या इच्छेखातर अनलॉक सुरु केला आणि मनोरंजनसृष्टीला पहिल्याच फेजमध्ये शूटिंग करायला परवानगी मिळाली. गेले वर्ष सरतेपर्यंत न्यू नॉर्मलमध्ये जगण्याचे नॉर्मल मध्ये परिवर्तन होईल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोनाच्या विषाणूने पुन्हा डोके वर काढले. हा विषाणू आधीपेक्षा तिप्पट विखारी आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. असो. तर आता अनेक चित्रपटांची आणि टीव्ही मालिकांची चित्रीकरणं जोरात सुरु आहेत आणि अनेक कलाकार बाधित होत असल्याच्या खबरी येत आहेत.
कोरोना-पॉझिटिव्ह लिस्टमध्ये विकी कौशल आणि भूमी पेडणेकर पण झाले सामील! - कोरोना-पॉझिटिव्ह लिस्टमध्ये भूमी पेडणेकर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बॉलिवूड सेलेब्रिटींवर मोठी आघात झाला आहे. बऱ्याच आघाडीच्या कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या काही दिवसापासून झळकल्या आहेत. कोरोना बाधित कलाकारांच्या लिस्ट मध्ये आता विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांची देखील वर्णी लागली आहे.