ETV Bharat / sitara

बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांचा जीवनप्रवास

author img

By

Published : Apr 30, 2020, 10:49 AM IST

Updated : Apr 30, 2020, 10:59 AM IST

बुधवारीच अभिनेते इरफान खान यांच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली होती. त्यांच्यापाठोपाठ आता ऋषी कपूर यांचे निधन झाल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

Vetran Actor Rishi Kapoor Life Story
बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांचा जीवनप्रवास

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ते ६७ वर्षाचे होते. या बातमीची माहिती अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली आहे.

बुधवारीच अभिनेते इरफान यांच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली होती. त्यांच्यापाठोपाठ आता ऋषी कपूर यांचेही निधन झाल्याने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

ऋषी कपूर यांचा अल्पपरिचय -

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ साली झाला होता. ते एक उत्तम अभिनेत्यासोबतच चित्रपट निर्माते तसेच दिग्दर्शकही होते. त्यांनी १९७४ साली 'बॉबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्याच्या रुपात एन्ट्री घेतली होती. त्यापूर्वी 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून बालपणीच त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती.

त्यांची पहिली वहिली मुख्य भूमिका असलेल्या 'बॉबी' चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये 'दामिनी', 'दो दुनी चार', 'कर्ज', 'प्रेमरोग', 'चांदनी', 'यादों की बारात', 'प्रेम ग्रंथ', 'पटियाला हॉउस', 'अग्निपथ', 'कपूर अँड सन्स' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

ऋषी कपूर यांनी 'खुल्लम खुल्ला' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

ऋषी कपूर यांना २०१८ साली पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जवळपास ८ महिने न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या चाहत्यांना या आजाराबाबत माहिती दिली होती. ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील एनएच रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भारतीय सिनेजगतात चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

Last Updated : Apr 30, 2020, 10:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.