नागपूर Vikas Thackeray On Nana Patole : विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे जागा वाटपासंदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. तर नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात येतोय, त्यामुळं घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) सर्व जागेवर दावा करत आहे.
तर नाना पटोले यांचा क्लेम मजबूत...: विकास ठाकरेंनी आता तर मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे फायनल झालं असल्याचं म्हंटलं आहे. याविषयी विकास ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की, आपल्या जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे. नाना पटोले विदर्भाचे नेते आहे. पटोले यांनी अपार मेहनत घेतली आहे, विदर्भातून काँग्रेसला भरभरून जागा मिळाल्या तर नैसर्गिकरित्या नाना पटोले यांचा क्लेम मजबूत असेल".
मुख्यमंत्रीपद खेचून आणू : हा नैसर्गिक क्लेम असल्यानं राहुल गांधी यांना मी आणि सगळे विदर्भातील कार्यकर्ते साकडे घालून नाना यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद खेचून आणू असं विकास ठाकरे म्हणाले. काँग्रेसमध्ये सर्वच सक्षम नेते आहेत, या स्पर्धेत विदर्भातील जनतेने काँग्रेसला जास्त जागा दिल्या तर विदर्भातील जनतेचा मुख्यमंत्रीपदावर हक्क असेल असेही ते म्हणाले आहेत.
नागपूरच्या सर्व ६ जागेवर काँग्रेस मजबूत : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपली शक्ती तपासून बघत आहे. विदर्भात यावेळी काँग्रेससाठी पोषक असे वातावरण आहे. त्याचबरोबर नागपुरात देखील काँग्रेसचा दावा हा मजबूत असल्यानं नागपूरच्या सर्व सहा जागेवर काँग्रेस लढण्यास तयार असल्याचं विकास ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा -
- राहुल गांधींनी घेतली दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट - Rahul Gandhi
- 'बदलापूर ते मालवण पुतळा दुर्घटना' सर्व घटनांसाठी RSS....; नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Nagpur Congress Protest
- राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी "एक अनार, सौ बिमार" अशी अवस्था - Vidhansabha Election 2024