Benefits Of Sugarcane Juice : उन्हाळा-हिवाळा किंवा पावसाळा असो, उसाचा रस पिण्याची औरच मज्जा असते. कोणत्याही ऋतुत उसाचा रस अत्यंत लाभकारी मानला जातो. हा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत तर करतोच सोबत यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा देखील मिळते. शिवाय, उसाचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि पाचन समस्या टाळण्यासाठी चांगला असल्याचं म्हटलं जाते. एका अभ्यासानुसार ऊसाच्या रसात कर्करोगाशी लढण्याची क्षमता देखील असल्याचं समोर आलं आहे. उसाचा रस नियमित पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे पोषणतज्ञ सांगतात. उसाच्या रसाचे इतर कोणते फायदे आहेत? चला पाहुयात.
उसाचा रस पिण्याचे 9 आश्चर्यकारक फायदे
- उसाचा रस कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मँगनीजचा समृद्ध स्रोत आहे. NIH आणि अनेक अभ्यासांच्या निष्कर्षांनुसार कर्करोगाशी लढण्यास ऊसाचा रस मदत करते. उसातील पोषक घटक शरीरातील कर्करोगाच्या पेशींची संख्या कमी करण्यास मदत करतात.
- उसाच्या रसामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसंच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत होते.
- उसाचा रस दात मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.
- उसाच्या रसामध्ये नैसर्गिक शर्करा असते. यामुळे शरीराला ऊर्जा देण्यास मदत होते. शरीराला ऊर्जा पुरवण्यासोबतच ऊसाचा रस डिहायड्रेशनपासूनही संरक्षण करते.
- उसाच्या रसामध्ये असलेले फायबर पचन क्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर करते.
- महिलांनी उसाच्या रसाचं नियमित सेवन केल्यानं मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि अशा अनेक आजारांपासून संरक्षण होते.
- यकृताचं कार्य सुधारण्यासाठी उसाचा रस पिणं चांगलं आहे. तज्ज्ञांच्या मते, यकृताचं आरोग्य राखण्यासाठी आणि यकृताशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी ते प्रभावी आहे.
- उसाच्या रसात कोलेजन असल्यानं त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होतात. उसाचा रस नियमितपणे पिणे निरोगी त्वचा राखण्यासाठी चांगले आहे.
- उसाचा रस हा तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळवण्याचा सर्वात आरोग्यदायी आणि नैसर्गिक मार्गांपैकी एक आहे. उसाचा रस कावीळपासून मुक्ती मिळवण्यासाठीही गुणकारी आहे.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4441162/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)