ETV Bharat / sitara

नताशासोबत लग्न करण्यासाठी वरुण धवन करतोय महामारी संपण्याची प्रतीक्षा - वरुण धवन नताशाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता

अभिनेता वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल गेल्या दोन वर्षांपासून लग्न करीत आहेत अशी चर्चा आहे. अलिकडेच त्याने आपण लग्न कधी करणारा याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

varun dhawan natasha dalal wedding
वरुण धवन आणि नताशा दलाल
author img

By

Published : Jan 9, 2021, 7:59 PM IST

Updated : Jan 11, 2021, 11:32 AM IST

मुंबई - कोविड -१९ चा सर्व देशभर असलेला उद्रेक झाला नसता तर बॉलिवूड अभिनेता वरुण धवन विवाहित झाला असता. प्रदीर्घ काळची मैत्रीण नताशा दलालसोबत तो लग्नगाठ बांधणार होता. याबाबतचा खुलासा वरुणने केला आहे.

वरुण गेल्या काही काळापासून नताशाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण तो आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सावधगिरी बाळगणे पसंत करतो. तो अधूनमधून नताशाबरोबरचे फोटो शेअर करतो. अलीकडे, ते वारंवार सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर परस्पर स्नेह पोस्ट देखील शेअर करतात.

वरुणने अलिकडेच एका वेबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत आपल्या रिलेशनबाबातचा खुलासा केला होता. त्याचे लग्न केव्हा होणार याबद्दल विचारले असता वरुण म्हणाला, "प्रत्येकजण मागील दोन वर्षांपासून याबद्दल बोलत आहेत. पण सध्या काहीच ठोस नाही. सध्या जगात इतकी अनिश्चितता आहे, पण जर परिस्थिती सुधारली तर डाउन (कोव्हीड आणि त्याचा प्रभाव), नंतर कदाचित यावर्षीच. म्हणजे ... मी लवकरच यासाठी प्लॅन बनवत आहे. पण अजून निश्चितता येऊ द्या. "

अलिकडेच झालेल्या करिना कपूरच्या 'व्हॉट वूमेन वॉन्ट' या रेडिओ शोमध्ये वरुणने गर्लफ्रेंड नताशा दलाल हिचा 'मंगेतर' असा उल्लेख केला. शोचा गेस्ट म्हणून आलेल्या वरुण धवनने यावेळी आपल्या खासगी आयुष्य आणि लग्न याबद्दल मोकळेपणाने बातचीत केली होती.

कोण आहे वरुणची गर्लफ्रेंड नताशा?

नताशा दलाल एक फॅशन डिझायनर आहे. तिने न्यूयॉर्कमधून फॅशनचे शिक्षण घेतले. नताशाचे सर्व कुटुंबिय दिल्ली वास्तव्याला असते. ती फॅशन डिझयनर असूनही प्रसिध्दीपासून दूर असते. अनेकवेळा ती वरुणसोबत कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

लहानपणापासून नताशा आणि वरुणची ओळख

वरुण धवन आणि नताशा लहानपाणापासूनच एकमेकांना ओळखतात. मोठे झाल्यानंतर दोघांची पुन्हा एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये भेट झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटत राहाणे सुरू झाले. आता त्यांचे हे भेटणे संसार सुरू करण्यापर्यंत पोहोचले आहे.

करिना कपूरच्या 'व्हॉट वूमेन वॉन्ट' या रेडिओ शोमध्ये लग्न करण्याविषयी बोलताना वरुण म्हणाला होता, ''पाहा, जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा त्यात काही गैर नाही. जेव्हा तुम्ही कोणासाोबत इतके काळ एकत्र आहात आणि चांगल्या प्रकारे ओळखता तेव्हा लग्न करणे योग्य आहे. मी जेव्हा भावाला आणि वहिनीला पाहिले तेव्हा लग्न करण्याबाबतची जाणीव झाली. जेव्हा मी पुतणी नायराला पाहिले तेव्हा हे चांगले वाटले."

२०२० मध्ये वरुण आणि नताशा थायलंडमध्ये विवाहबंधनात अडकल्याची बातमी आली होती. पण साथीच्या आजारामुळे दोघांना एकत्र आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आणखी थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे.

Last Updated : Jan 11, 2021, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.