नवी दिल्ली: अभिनेता वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांनी राज मेहताच्या 'जुग जुग जीयो' चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटाच्या सेटवर अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर वरुणसह इतर कलाकार कोरोनामुक्त झाले असून सेटवर भेटल्याचा आनंद वरुण आणि कियाराने इन्स्टाग्रामवरुन व्यक्त केला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला धवन आणि ज्येष्ठ अभिनेते नीतू कपूर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर चित्रपटाचे सुटिंग थांबवण्यात आले होते.
कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांनी सेल्फी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून दोघांनीही फेस मास्क घातलेले दिसतात.
हेही वाचा - सलोनी गौरच्या नव्या 'रनआऊट' व्हिडिओवर कंगना भडकली
राज मेहताच्या 'जुग जुग जीयो' मध्ये अनिल कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर या कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा - नुसरत भरुचाला 'छोरी'च्या शूटिंगच्यावेळी अश्रू अनावर