ETV Bharat / sitara

रियाच्या अनेक रहस्यांचा तिच्या दोन मोबाईलमधून उलगडा; पाहा... - Sushant Singh Rajput latest news

रिया चक्रवर्तीची चौकशी सीबीआय पथक करीत आहे. यामध्ये तिच्या दोन मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. यामुळे तपासाच्या दिशेला वेगळे वळण मिळाले आहे.

Rhea Chakraborty l
रिया चक्रवर्ती
author img

By

Published : Aug 27, 2020, 3:43 PM IST

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी करणार्‍या केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने तिच्या जवळच्या साथीदारांशी केलेल्या संभाषणाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे तपासाला एक वेगळीच दिशा मिळाली आहे.

सीबीआयची एसआयटी जेव्हा मुंबईला आली तेव्हा त्यांची पहिली प्राथमिकता रिया चक्रवर्ती आणि तिच्या साथीदारांच्या डिजिटल फुटप्रिंट्सची तपासणी करणे होती. ही घटना जूनमध्ये घडली असल्याने संशयितांकडून कोणत्याही प्रकारचे पुरावे मिटवण्याचे सर्व प्रयत्न केले गेले असतील अशी भीती केंद्रीय एजन्सीला होती.

केंद्रीय एजन्सीच्या पथकाने दोन मोबाइल फोन जप्त केले, ज्यांची चौकशी केली. त्यातील बहुतेक डेटा आधीच गायब झाला असला तरी, नंबरवरून हटविलेला डेटा परत मिळविण्यासाठी त्याने दोन्ही फोन नंबर क्लोन केले. यातून मिळालेल्या माहितीमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणात रियासह अनेक जण सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

वृत्तसंस्थेने मिळवलेल्या काही अंतर्गत कागदपत्रांमध्ये खुलासा झालाय की, रियाच्या कथित बँकेची फसवणूक आणि ड्रग पेडलर्सशी संबंधित असल्याचे एजन्सीच्या उघडकीस आले आहे.

सूत्रांनी सांगितले आहे की, रियाने सुशांतच्या डेबिट कार्डचा पासवर्ड चोरी केला होता आणि यासाठी तिने सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडाची मदत घेतली.

मुंबईतील वांद्रे फ्लॅटमध्ये १४ जूनला ३४ वर्षीय अभिनेता सुशांत रहस्यमय परिस्थितीत मृत अवस्थेत आढळला होता आणि २५ जुलै रोजी पाटणा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबीयांचे नाव मुख्य संशयित म्हणून आले होते.

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया आणि मिरांडा त्यांच्या कामासाठी सुशांतचा निधी वापरत होते.

अंतर्गत कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की ते (रिया आणि सॅम्युएल) अतिशय सामंजस्याने काम करीत होते आणि सुशांतसिंह राजपूतचे पैसे त्यांच्या कामासाठी वापरत होते.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरूवातीला केलेल्या मिरांडाच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झाला आहे.

रियाने सुशांतच्या डेबिट कार्डचा पासवर्ड का चोरला याचा तपास एजन्सी करत आहेत. एजन्सीना अशीही माहिती मिळाली की रिया ड्रग्समध्ये गुंतली होती आणि मिरांडा देखील तिच्याशी जवळून सहभागी होता.

रियाचा ड्रग पेडलर्सशी संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) देखील तपासात भाग घेतला आहे. ब्युरोने गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बिहार सरकारच्या शिफारसीवरुन केंद्र सरकारच्या आदेशाने सीबीआयने 6 ऑगस्ट रोजी तपासाची जबाबदारी स्वीकारली.

ही बाब के.के. सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचे माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या आधारे ईडीने 31 जुलै रोजी पाटणा पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. सुशांतच्या वडिलांनी आरोप केला आहे की सुशांतच्या कोटक महिंद्रा बँकच्या खात्यातून अज्ञात बँक खात्यात 15 कोटी रुपयांचा व्यवहार केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.