ETV Bharat / sitara

इम्तियाज दिग्दर्शक नव्हे तर जादूगर, कार्तिकने शेअर केला 'लव आज कल'च्या सेटवरील अनुभव - कार्तिकने शेअर केला 'लव आज कल'च्या सेटवरील अनुभव

कार्तिकने आपल्या इन्स्टाग्रामवरुन लव आज कलच्या सेटवरील आणि अलीसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने पोस्ट शेअर करत चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना येणारे अनुभवही सांगितले आहेत.

कार्तिकने शेअर केला 'लव आज कल'च्या सेटवरील अनुभव

author img

By

Published : May 8, 2020, 3:04 PM IST

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यनने 'लव आज कल' सिनेमात दुहेरी भूमिका साकारली आहे. याबद्दल कार्तिक म्हणतो, एकाच सिनेमात दुहेरी भूमिका साकारणे कठीण असते. मात्र, 'लव आज कल'मधील वीर आणि रघुची भूमिका साकारणं मला सोपं गेलं, याचं श्रेय दिग्दर्शक इम्तियाज अलीला जातं. आपल्या चित्रपटातील कलाकारांकडून उत्तम अभिनय करुन घेणं अलीला खूप चांगल्या पद्धतीनं जमत असल्याचं कार्तिकचं म्हणणं आहे.

कार्तिकने आपल्या इन्स्टाग्रामवरुन 'लव आज कल'च्या सेटवरील आणि अलीसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. याासोबतच त्याने पोस्ट शेअर करत चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना येणारे अनुभवही सांगितले आहेत.

कार्तिकने लिहिलं, जेव्हा आपण पहिल्यांदा चित्रपटात येण्याचे स्वप्न पाहतो, तेव्हा आपण आरशासमोर उभा राहून अभिनय करण्याचा प्रयत्न करतो आणि चित्रपटांचे जग जादूई दिसू लागते. मग तुम्हाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. तुम्ही तिथे कॅमेरा पाहून घाबरुन जाता. कारण, तुम्ही मुंबईला घेऊन आलेल्या तुमच्या सुटकेसपेक्षाही तो मोठा असतो. चेहऱ्यावर पडणाऱ्या लाईटचा तो प्रकाश जणू सर्वांचा वेळ वाया घालवल्याने तुमच्यावर रागवत असतो.

सुरुवातीचे काही वर्ष प्रयत्नातच निघून जातात आणि मग तुम्हाला इम्तियाज अलीच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. अली जेव्हा त्यांच्या सिनेमाची कथा सांगतात तेव्हा आपण आपोआप स्वप्नात जातो. त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर माझं लक्ष कधीच कॅमेऱ्याकडे गेलं नाही. ते मला सूचना देत नव्हते, तर माझ्या बाजूला उभा राहून अभिनय करुन घेत होते. इम्तियाज अलीच्या सेटवरील याच लाईट तुम्हाला तुमची वाट दाखवतात, असेही कार्तिक पोस्टमध्ये म्हणाला.

पुढे कार्तिकने लिहिलं, याआधी कधीही मिळालं नाही, असं प्रेम आणि कौतुक या चित्रपटातील अभिनयासाठी मिळालं, तेही माझ्या आवडत्या आणि मला सर्वाधिक आदर असलेल्या चित्रपट निर्मात्याकडून. एकाच चित्रपटात दोन भूमिका साकारण्याची मला भीती वाटत होती. मात्र, हे इतक्या सोप्या पद्धतीनं कसं झालं, हे मलाच समजलं नाही. एका कलाकारासाठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. हेच कारण आहे ज्यामुळे सगळे मोठ मोठे आणि उत्तम कलाकार इम्तियाज अलीच्या चित्रपटांमध्ये काम करतात.

इम्तियाज अली दिग्दर्शक नाही, तर जादूगर आहे. मला हा उत्तम अभिनय करण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद, असं म्हणत कार्तिकने इम्तियाज अलीचे आभार मानले आहेत. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या भूमिका असलेला 'लव आज कल' चित्रपट व्हॅलंटाईन डे दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाला प्रेक्षकांची फार पसंती मिळाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.