मुंबई - म्यूझिक लेबल आणि टी सिरीज प्रॉडक्शन हाऊसने बुधवारी महाराष्ट्र निर्माण सेना (मनसे)ने आक्षेप घेतल्यानंतर पाकिस्तानी गायक अतिफ असलमचे गाणे यूट्यूबवरुन हटवले आहे. टी सिरीजने गेल्या शनिवारी गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'मरजावां' या चित्रपटातील 'किन्ना सोना' हे अतिफ यांच्या आवाजातील गाणे रिलीज केले होते. परंतु त्यांचे हे पाऊल मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना खटकले. हा व्हिडिओ हटवण्याची सूचना त्यांनी दिल्यानंतर प्रॉडक्शन हाऊसने ही मोठी अॅक्शन घेतली आहे.
-
WARNING TO TSERIES
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take down Pakistani singer Atif-Aslam song from your TSeries youtube channel immediately else we will take a major action against @TSeries. #TakeDownAtifAslamSong @itsbhushankumar @mnsadhikrut @rajupatilmanase
">WARNING TO TSERIES
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 23, 2020
Take down Pakistani singer Atif-Aslam song from your TSeries youtube channel immediately else we will take a major action against @TSeries. #TakeDownAtifAslamSong @itsbhushankumar @mnsadhikrut @rajupatilmanaseWARNING TO TSERIES
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 23, 2020
Take down Pakistani singer Atif-Aslam song from your TSeries youtube channel immediately else we will take a major action against @TSeries. #TakeDownAtifAslamSong @itsbhushankumar @mnsadhikrut @rajupatilmanase
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये टी सिरीजने म्हटलंय की, त्यांच्या यूट्यूबर हे गाणे चुकून अपलोड झाले. पत्रात लिहिलंय, ''अतिफ असलमचे हे गाणे आमच्या एका कर्मचाऱ्याने टाकले होते. त्याचे लक्ष नव्ह्ते त्यामुळे त्याच्याकडून चूक झाली. आम्हाला याचा खेद आहे आणि यासाठी आम्ही माफी मागत आहोत.''
-
'टी-सिरीज'ने पाकिस्तानी कलाकाराचं गाणं प्रदर्शित केल्यानंतर पक्षाच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष @MNSAmeyaKhopkar ह्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून व्यवस्थापनाने चूक मान्य करत भारतीयांची जाहीर माफी मागितली आहे. #मनसेदणका pic.twitter.com/etJmTNYXQj
— MNS Tweets (@manaseit) June 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'टी-सिरीज'ने पाकिस्तानी कलाकाराचं गाणं प्रदर्शित केल्यानंतर पक्षाच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष @MNSAmeyaKhopkar ह्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून व्यवस्थापनाने चूक मान्य करत भारतीयांची जाहीर माफी मागितली आहे. #मनसेदणका pic.twitter.com/etJmTNYXQj
— MNS Tweets (@manaseit) June 24, 2020'टी-सिरीज'ने पाकिस्तानी कलाकाराचं गाणं प्रदर्शित केल्यानंतर पक्षाच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष @MNSAmeyaKhopkar ह्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून व्यवस्थापनाने चूक मान्य करत भारतीयांची जाहीर माफी मागितली आहे. #मनसेदणका pic.twitter.com/etJmTNYXQj
— MNS Tweets (@manaseit) June 24, 2020
त्यांनी पुढे लिहिलंय, ''आम्ही आपल्याला खात्री देतो की, हे गाणे आमच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार नाही आणि याचे आम्ही प्रमोशनही करणार नाही. आम्ही गाणे हटवत आहोत आणि दुसऱ्यांदा खात्री देतो की, यापुढे कोणत्याही पाकिस्तानी गायकासोबत काम करणार नाही.''
गेल्या वर्षी पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मनसेने या म्यूझिक कंपनीला कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम न करण्याचा इशारा दिला होता. उरी हल्ल्यानंतर २०१६ पासून पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरही गदा आली होती. कारण यात पाकिस्तानी कलाकार फवाद खानने काम केले होते. करण जोहरच्या माफीनाम्यानंतर या विषयावर पडदा पडला होता.