मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे एका खास नृत्याच्या माध्यमातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला श्रद्धांजली वाहणार आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डान्सचा सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडच्या 'तारों के शहर' गाण्यावर डान्सचा सराव करताना दिसत आहेत.
दिवंगत सुशांतच्या चाहत्यांनी अलिकडेच अंकितावर टीका केली होती. आयुष्यात ती पुढे निघून गेली असून तिला सुशांतला न्याय मिळण्यासाठी कोणताच रस नसल्याचे चाहत्यांनी म्हटले होते.
हेही वाचा - आदित्य रॉय कपूर बनला स्वत:ची '3डी बोलकी बाहुली' असलेला पहिला अभिनेता !
अंकिताने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती बरीच खुश दिसत होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर दिवंगत अभिनेत्याच्या चाहत्यांनी अंकिताला जोरदार ट्रोल केले होते.
एका युजरने लिहिले, "तुम्ही सुशांत सरांना विसरलात."
दुसर्याने लिहिले, "तुला सुशांत सरांची आठवण येत नाही."
एका युजरने अंकिताला चिडवत लिहिले की, "तुम्ही रोज फोटो अपलोड करा, आम्ही तुम्हाला रोज सुशांतची आठवण करून देत राहू."
हेही वाचा - आशिकी' फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटीत दाखल