ETV Bharat / sitara

पुन्हा सुरू झाला धुमाकुळ, बहुप्रतीक्षित 'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज - Sharwari Bunty in the lead roles

बहुप्रतीक्षित 'बंटी और बबली 2' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली चित्रपटात तरबेज चोरी करणारी जोडी दाखवण्यात आली होती. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचा 'बंटी और बबली 2' हा सिक्वेल आहे.

'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज
'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Oct 25, 2021, 5:00 PM IST

अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या बहुप्रतीक्षित 'बंटी और बबली 2' या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता लागून राहिली आहे. या चित्रपटातून तब्बल 12 वर्षांनंतर सैफ अली खान आणि राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत.

'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज
'बंटी और बबली 2'चा ट्रेलर रिलीज

या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन आपल्याला कथानकाचा अंदाज येऊ शकतो. 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबली चित्रपटात तरबेज चोरी करणारी जोडी दाखवण्यात आली होती. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचा 'बंटी और बबली 2' हा सिक्वेल आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बंटी और बबली 2' चित्रपटाची कथा मनोरंजक वाटते. सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी बंटी आणि बबली बनून पोलिसांना चक्रावून सोडतात. त्यामुळे पोलिसांना वाटते की जुने बंटी आणि बबली परत आले आहेत. पोलीस सैफ आणि राणीला अटक करतात. त्यानंतर सैफ आणि राणी एक जबरदस्त खेळी करतात आणि बंटी आणि बबलीची नावे वापरणाऱ्यांच्या शोधार्थ मोहीम उघडतात.

'बंटी और बबली 2 ' 19 नोव्हेंबर रोजी देशभर चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सची आहे.

हेही वाचा - सिनेसृष्टीसाठी दिला जाणारा सर्वोच्च दादासाहेब पुरस्कार रजनीकांतना प्रदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.