धर्मा प्रॉडक्सन आणि काश एन्टरटेन्मेंट फिल्म्सची निर्मिती असलेला 'शेरशाह' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 22 वर्षापूर्वी कारगिलच्या बर्फाळ टेकड्यावर झालेल्या घनघोर युध्दावर आधारित हा चित्रपट आहे. हे भारताचे पहिले टेलीवाइज्ड युध्द होते. याचे वार्तांकन सुरू होते. हिमालयाच्या टोकावर 16000 फुट उंचीवर झालेली ही अटीतटीची लढाई सैनिकांच्या बलिदानातून भारताने जिंकली होती. आपल्या पराक्रमी सैनिकांनी दुश्मनाला चारीमुंड्या चीत केले. काही युध्दावर गेलेले सैनिक परतलेच नाहीत, तर काहींनी आपले रक्त सांडले, पण आपला तिरंगा फडकवत ठेवला.
-
An ordinary man’s extraordinary journey of courage and valour. Extremely honoured, thrilled & excited to present #ShershaahOnPrime, releasing on 12th August only on @primevideoin.#Shershaah @SidMalhotra @Advani_Kiara @vishnu_dir @apoorvamehta18 pic.twitter.com/k2KHrAI9ny
— Karan Johar (@karanjohar) July 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An ordinary man’s extraordinary journey of courage and valour. Extremely honoured, thrilled & excited to present #ShershaahOnPrime, releasing on 12th August only on @primevideoin.#Shershaah @SidMalhotra @Advani_Kiara @vishnu_dir @apoorvamehta18 pic.twitter.com/k2KHrAI9ny
— Karan Johar (@karanjohar) July 15, 2021An ordinary man’s extraordinary journey of courage and valour. Extremely honoured, thrilled & excited to present #ShershaahOnPrime, releasing on 12th August only on @primevideoin.#Shershaah @SidMalhotra @Advani_Kiara @vishnu_dir @apoorvamehta18 pic.twitter.com/k2KHrAI9ny
— Karan Johar (@karanjohar) July 15, 2021
या युध्दात 24 वर्षे वयाच्या कॅप्टन विक्रम बात्रा यांनी पराक्रमाची शर्थ केली. कॅप्टन बात्रा यांना शेरशाह या 'कोड'नावानेही ओळखले जात असे. शेरशाहच्या नेतृत्वाखाली हिमालय पर्वतावरील सर्वात खडतर ऑपरेशन केले गेले. कारगिल युध्दाची ही थरारक समरगाथा येत्या 12 ऑगस्ट रोजी स्वातंत्रयदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर याचा प्रीमियर पाहता येणार आहे.
कारगील युद्धात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विष्णु वर्धन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, करण जोहर, हिरू जोहर, अपुर्वा मेहता, शब्बीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशू गांधी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा - सनी लिओन झाली 'मुंबईकर' : पती आणि तीन मुलांसह केला गृहप्रवेश