मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अवघ्या १३ दिवसात या सिनेमाने २०० कोटींचा गल्ला पार करत बॉक्स ऑफिसवर द्विशतक केले. आता भारतापाठोपाठ 'कबीर सिंग'ने ऑस्ट्रिलायातील प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत.
या सिनेमाने ऑस्ट्रेलियात 9,59,994 डॉलर म्हणजेच ४६ कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. या कमाईसोबतच हा चित्रपट २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
-
Top 5 highest grossing films in #Australia... 2019 releases...
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1. #KabirSingh: A$ 959,994
2. #GullyBoy: A$ 944,974
3. #Uri: A$ 887,921
4. #Bharat: A$ 852,506
5. #Kalank: A$ 834,037
[Data + BO ranking as on 7 July 2019]
⭐️ #KabirSingh will cross A$ 1 million soon.@comScore
">Top 5 highest grossing films in #Australia... 2019 releases...
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2019
1. #KabirSingh: A$ 959,994
2. #GullyBoy: A$ 944,974
3. #Uri: A$ 887,921
4. #Bharat: A$ 852,506
5. #Kalank: A$ 834,037
[Data + BO ranking as on 7 July 2019]
⭐️ #KabirSingh will cross A$ 1 million soon.@comScoreTop 5 highest grossing films in #Australia... 2019 releases...
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2019
1. #KabirSingh: A$ 959,994
2. #GullyBoy: A$ 944,974
3. #Uri: A$ 887,921
4. #Bharat: A$ 852,506
5. #Kalank: A$ 834,037
[Data + BO ranking as on 7 July 2019]
⭐️ #KabirSingh will cross A$ 1 million soon.@comScore
तर ऑस्ट्रेलियात 'कबीर सिंग'च्या पाठोपाठ 'गली बॉय', 'उरी', 'भारत' आणि 'कलंक' या चित्रपटांचा टॉप ५ चित्रपटांच्या यादीत समावेश आहे. इतकंच नव्हे तर 'कबीर सिंग'ने दाक्षिणात्य 'पेट्टा' आणि 'महर्षी'सारख्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले असून लवकरच कबीर सिंग १ मिलियन डॉलरचा आकडा पार करेल, असं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं आहे.