ETV Bharat / sitara

समाज माध्यमांवर ‘तूफान’ ला मिळतोय वादळी पाठिंबा, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश झालेत खूष! - दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश

नुकताच ‘तूफान’ हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले असल्यामुळे फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश ही दिग्दर्शक-अभिनेता जोडी खुषीत आहे.

'Storm' on social media
समाज माध्यमांवर ‘तूफान’
author img

By

Published : Jul 17, 2021, 1:07 AM IST

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश आणि अभिनेता फरहान अख्तर हे ‘भाग मिल्खा भाग’ या स्पोर्ट्स-फिल्म साठी एकत्र आले होते आणि ‘तूफान’ यश मिळविले होते. त्यांनी आता पुन्हा एक स्पोर्ट्स-फिल्म आणलीय जिचे नाव ‘तूफान’ आहे आणि ती बॉक्सिंग या खेळावर आधारित आहे. नुकताच ‘तूफान’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले असल्यामुळे फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश ही दिग्दर्शक-अभिनेता जोडी खुषीत आहे. ‘तूफान’ मध्ये फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट अजीज अली या मुष्टीयोध्याची कहाणी असून डोंगरी ते बॉक्सिंग रिंग पर्यंतचा त्याचा प्रवास अधोरेखित करतो.

भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा या दमदार जोडीने ‘तूफान’ मधून एक दमदार पंच पेश केलाय. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे. तुफान मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जिवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांनी या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे. फरहानच्या दमदार अभिनयाची प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी स्तुती केली आहे आणि या भूमिकेसाठी त्याने केलेल्या बॉडी-ट्रान्सफॉर्मिंग ची प्रशंसा होतेय. मृणाल ठाकूर अनन्याची भूमिका साकारत आहे, जी अज्जूला सतत प्रेरणा देत असते. तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मृणाल आणि फरहानची केमिस्ट्री उत्तम जुळल्याचा निवाडा देण्यात आला आहे. केमिस्ट्रीच्या बाबतीत फरहान आणि त्याचा बॉक्सिंग गुरु नाना च्या भूनिकेतील परेश रावल यांच्या ट्युनिंगचीही चर्चा आहे. एकंदरीतच ‘तूफान’ प्रेक्षकांना आवडतोय आणि ते समाज माध्यमांवर तसे व्यक्त होताहेत.

  • तूफां पर्वत को तोड़ दे,
    तूफां दरिया को मोड़ दे,
    तूफां सूरज निचोड़ दे
    You rocked @FarOutAkhtar,
    Muhammad Ali Bhai would have been very proud of you 😉#Toofaan #FarhanAkhtar #Boxing pic.twitter.com/K1vZtxotCu

    — Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) July 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • @FarOutAkhtar #Toofaan A jaw dropping tale of extreme grit, determination & perseverance. Farhan packs a solid punch delivering a total knockout act; while Paresh is earnest to the core. Mrinal is so endearing. ROM’s direction is razor sharp. Simply awe-inspiring stuff!⭐️⭐️⭐️ 1/2

    — Bhavikk Sangghvi (@bhavikksangghvi) July 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'तूफान’ ची जादू पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘तूफान’ ची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि ROMP पिक्चर्सनी केली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ROMP पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे "तूफान" सादर केला गेला आहे. ‘तूफान’ या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक शाह आणि हुसेन दलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ती दिग्दर्शित केला आहे.

हेही वाचा - HBD Katrina : कॅटरिना कैफला आहेत सहा बहिणी आणि एक भाऊ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.