अजय देवगणचं दिग्दर्शन करीत असलेल्या ‘मेडे’ या चित्रपटाची प्रतीक्षा खूप काळापासून केली जात आहे. आता या चित्रपटाच्या शीर्षकामध्ये बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट ‘रनवे ३४’ या नावाने रिलीज होणार आहे. अजय देवगणसह अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंहचा सिनेमातील फर्स्ट लूकदेखील शेअर करण्यात आला आहे.
‘रनवे ३४’ हा चित्रपट २०२२मधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणने सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केलाय. त्याने लिहिलंय, “मे-डे आता ‘रनवे ३४’ झाला आहे. हा थ्रीलर चित्रपट वास्तव घटनांशी प्रेरित आहे असून तो माझ्या खूप जवळचा आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्याने एक नोटही शेअक केलीय. यात त्याने लिहिलं, ” आपले डोळे बंद करा आणि त्या क्षणांचा विचार करा जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच...तो म्हणजे जेव्हा आपल्याला आपण संपूर्ण जग जिंकलो आहोत असतानाच दुसऱ्याच क्षणी आपण खूप हताश झाल्यासारखं वाटतं”
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय आणि रकुल एका वैमानिकाच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. अमिताभ बच्चन यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
‘रनवे ३४’ हा चित्रपट २०२२ मधील ईदला म्हणजेच २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यात अमिताभ आणि रकुल प्रीत सिंह सोबतच बोमन ईरानी, अकांक्षा सिंह, अंगीरा धर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा - अनुपम खेरने शेअर केलाआई दुलारीसोबतचा मजेशीर व्हिडिओ