मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःच्या गोष्टी तो नेहमी फॅन्ससोबत अपडेट करीत असतो. अलिकडेच इन्स्टाग्रामवर त्याने 'आस्क मी एनीथिंग' या सत्रात चाहत्यांशी संपर्क साधला. त्याने अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली. मात्र, 'तुझे कौमार्य भंग झालेय का ?' या प्रश्नावर तो अडखळला.
इन्स्टा स्टोरीमध्ये एका युजरने त्याला प्रश्न विचारला, 'तुझे कौमार्य भंग झालेय का?' या प्रश्नाला त्याने फिल्मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. टायगरने लिहिले, ''अबे बेशरम ! मेरे मॉम डॅड भी फॉलो कर रहे है मुझे.'' ( बेशरम, माझे आई वडिलही फॉलो करतात मला. )

''टायगरला आतापर्यंत किती गर्लफ्रेंड आहेत ?'' असा प्रश्नही विचारण्यात आला होता. याच्या उत्तरवार तो म्हणतो, ''पुरेशा नाहीत.''
आणखी एका सत्रामध्ये त्याला काही तिरकस प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एक प्रश्न होता, 'तो दिशा पटाणीला डेटींग करीत आहे का ?' यावर तो म्हणाला, ''मेरी औकात नही है भाई.''
टायगर आणि दिशा पटाणी अनेक काळापासून डेटींग करीत असल्याची चर्चा आहे. सध्या टायगर श्रॉफ 'वॉर' या चित्रपटात ह्रतिक रोशनसोबत काम करीत आहे. यात वाणी कपूरची भूमिका आहे, सिध्दार्थ आनंद याचे दिग्दर्शन करीत आहेत. 'वॉर' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१९ ला रिलीज होणार आहे.