ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफने ‘कॅसानोवा’ च्या शूटचा ‘बीटीएस’ व्डिहिओ केला शेअर, फॅन्समध्ये जल्लोष!

author img

By

Published : Jan 29, 2021, 7:25 PM IST

हल्ली प्रत्येक चित्रपट, सिरीयल, म्युझिक व्हिडीओ आदी चित्रित करतानाचे व्हिडीओसुद्धा चित्रित केले जातात. ज्याला ‘बिहाइंड द सीन्स’ म्हणजेच ‘बीटीएस’ व्हिडीओज म्हटले जाते. टायगर श्रॉफने अलीकडेच त्याने गायलेले दुसरे गाणे ‘कॅसानोवा’ रिलीज केले होते. त्याचा म्युझिक व्हिडिओही लोकांना जबरी आवडला होता. त्याने आता ‘कॅसानोवा’ च्या शूटचा ‘बीटीएस’ व्डिहिओ केला शेअर केला आहे.

टायगर श्रॉफ

मुंबई - हल्ली प्रत्येक चित्रपट, सिरीयल, म्युझिक व्हिडीओ आदी चित्रित करतानाचे व्हिडीओसुद्धा चित्रित केले जातात. चित्रीकरणादरम्यान काय काय घडलं हे या पडद्यामागील चित्रणावरून कळते, ज्याला ‘बिहाइंड द सीन्स’ म्हणजेच ‘बीटीएस’ व्हिडीओज म्हटले जाते. वाघासारख्या चपळ डान्स-मूव्ह्स असलेला गाण्याच्या व्हिडिओ चित्रित होतानाच ‘बीटीएस’ व्हिडिओ, त्याने आपल्या समाज माध्यमावर पोस्ट केला व त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. टायगर श्रॉफने अलीकडेच त्याने गायलेले दुसरे गाणे ‘कॅसानोवा’ रिलीज केले होते. त्याचा म्युझिक व्हिडिओही लोकांना जबरी आवडला होता.

‘कॅसानोवा’ च्या शूटचा ‘बीटीएस’ व्डिहिओ

टायगर श्रॉफ मल्टी टॅलेंटेड आहे हे त्याने सिद्ध केले आहे. उत्तम शरीरयष्टी, अप्रतिम डान्स मूव्ह्स आणि तगडा अभिनय यामुळे तो आघाडीच्या नटांपैकी एक आहे. त्याच्या ‘ॲक्शन’वर तर बच्चे कंपनी फिदा आहे. त्याला गाण्याचेही अंग आहे हे बघून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. पहिले गाणे ‘अनबिलीव्हेबल’ हिट झाले हा फक्त नशिबाचा भाग नव्हता हे त्याने दुसऱ्या गाण्याच्या यशावरून सिद्ध केलेय. टायगर श्रॉफ अनेक प्रतिभांचा माणूस आहे. तो नाचू शकतो, तो अभिनय करू शकतो आणि धाडसी अ‍ॅक्शन सिक्वेन्स लीलया करू शकतो हा त्याच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा भाग आहे.

टायगर चे एकल गाणे 'कॅसानोवा' या वर्षीच्या १३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आले. ते टायगरच्या स्वतःच्या यूट्यूब पेजवर प्रसिद्ध झाले. या गाण्याचेही सर्व स्तरावर कौतुक झाले त्यामुळे टायगर खुश असून, ‘माझ्या गाण्याला मिळालेला प्रतिसाद बघून मी सद्गतित झालोय. अशा कौतुकामुळे अजून चांगलं काम करण्याची जबाबदारीही वाढली आहे’ असं म्हणाला. हे गाणे बनवण्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत असं म्हणत टायगर श्रॉफ ने ‘कॅसानोवा’ गाण्याच्या तयारीचा आणखी एक बीटीएस व्हिडिओ सामायिक केला आहे.

हेही वाचा - अखेर बहुप्रतीक्षित 'केजीएफ २'च्या रिलीजची तारीख ठरली

ज्युनियर मि. श्रॉफ सिनियर मि. श्रॉफसोबत ‘बागी ३’ मध्ये तो दिसला होता व आता टायगर नजीकच्या काळात ‘हीरोपंती २’ मध्ये दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.