ETV Bharat / sitara

‘हिरोपंती २’ आणि 'गणपथ'सह टायगर श्रॉफ यावर्षी प्रेक्षकांचे खास मनोरंजन करण्यासाठी सज्ज !

author img

By

Published : Jan 14, 2022, 9:03 PM IST

तरुणाईचा आणि खासकरून लहान मुलांचा आवडता अभिनेता टायगर श्रॉफ आपला अभिनय, ॲक्शन आणि नृत्य यावर जास्त फोकस करीत असतो. या वर्षात त्याचे दोन ‘बिग तिकीट’ चित्रपट येऊ घातले आहेत. २०२२ साली टायगर श्रॉफ ‘हिरोपंती २’ आणि ‘गणपत’ या दोन बिग बॅनर चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे.

टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ

मुंबई - कसे असेल नवीन वर्ष? प्रत्येकालाच नवीन वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते आणि याला फिल्मस्टार्स देखील अपवाद नाहीत. परंतु बरेच स्टार्स आपल्या चित्रपटाच्या शूट्सची, प्रदर्शनाची आधीपासूनच आखणी करीत असतात म्हणून फिल्म कलाकारांना भवितव्याबद्दल निश्चिन्तता असते. अर्थातच चित्रपट चालवणे अथवा न चालवणे हे सर्वकाही मायबाप प्रेक्षकांच्या हाती असते. आणि त्यामुळेच कलाकार आपल्या कामात १००% देत असतात. आपल्या कामात १००% किंवा थोडेसे जास्तच टाकणारा कलाकार म्हणजे टायगर श्रॉफ. तरुणाईचा आणि खासकरून लहान मुलांचा आवडता अभिनेता टायगर आपला अभिनय, ॲक्शन आणि नृत्य यावर जास्त फोकस करीत असतो. या वर्षात त्याचे दोन ‘बिग तिकीट’ चित्रपट येऊ घातले आहेत.

टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ

बॉलिवूड तारे त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सणासुदीच्या हंगामाची वाट पाहत असतात आणि प्रेक्षक देखील पॉवर-पॅक्ड मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाकडे लक्ष ठेवून असतात. याकाळात संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन चित्रपटाचा आनंद लुटतात. सणासुदीचा मोसम बहुतेक मोठ्या स्टार्सनी बुक केला असतो आणि यावेळी टायगर श्रॉफनेही सणासुदीचा हंगाम आपल्या नावावर बुक केला आहे. याचे कारण म्हणजे त्याचे चित्रपट 'हिरोपंती २’ आणि 'गणपथ' या वर्षी शूटिंग पूर्ण करणार आहेत. टायगरच्या या दोन चित्रपटांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून प्रेक्षक, खासकरून त्याचे फॅन्स, त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पहात आहेत.

टायगरचे चाहते नेहमीच त्याच्या कधीही न पाहिलेल्या ॲक्शन सीक्वेन्स आणि अप्रतिम डान्स मूव्ह्सची वाट पाहत असतात. आगामी काळात टायगरकडे आणखी ३ चित्रपट आहेत ज्यावर तो काम करत आहे. तसेच, २०२२ च्या सणासुदीच्या हंगामासाठी दोन मोठे चित्रपट हातात असणार्‍या फिल्म इंडस्ट्रीमधील इतर तरुण अभिनेत्यांपैकी तो कदाचित एकमेव आहे असे दिसते.

टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ

अहमद खान दिग्दर्शित, "हिरोपंती २" २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना टायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच विकास बहलचा 'गणपथ' २३ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज होऊ घातला आहे. या चित्रपटाची निर्मिती विकास बहल, जॅकी भगनानी, वाशू भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी गुड कंपनी प्रॉडक्शन आणि पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ

आतापर्यंत प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा पाहून टायगर भारावून गेला आहे. तो म्हणतो की, "२०२२ हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आणि खास वर्ष आहे कारण माझे दोन्ही चित्रपट 'हिरोपंती २' आणि 'गणपथ' अनुक्रमे ईद आणि ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहेत. विशेषत: आजपर्यंत केवळ आमच्या उद्योगातील दिग्गजांनीच हाती घेतलेल्या रिलीजसाठी सणाच्या तारखा रोखणे ही एक मोठी गोष्ट आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी आमच्या निर्मात्यांचा आभारी आहे. त्या बदल्यात, मी फक्त कठोर परिश्रम करत राहणे आणि माझ्या आवडत्या प्रेक्षकांसाठी माझे सर्वोत्तम प्रदर्शन देणे एवढेच करू शकतो."

यावर्षी म्हणजेच २०२२ साली टायगर श्रॉफ ‘हिरोपंती २’ आणि ‘गणपथ’ या दोन बिग बॅनर चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे.

हेही वाचा - फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा २१ फेब्रुवारी रोजी होणार विवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.