ETV Bharat / sitara

'बागी ३' मधील नवे गाणे रिलीज, 'भंकस'वर नाचताना दिसले सर्व कलाकार - 'बागी ३' चित्रपटातील 'भंकस' हे गाणे रिलीज झाले

टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूरच्या आगामी 'बागी ३' चित्रपटातील 'भंकस' हे गाणे रिलीज झाले आहे. हे एक पार्टी नंबर गीत आहे. रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडेच्या लग्नात टायगर आणि श्रध्दाने भरपूर धमाल केल्याचे या गाण्यात दिसते.

wedding song Bhankas from Baghi 3
'बागी ३' मधील नवे गाणे रिलीज
author img

By

Published : Feb 19, 2020, 7:18 PM IST

टायगर श्रॉफ आणि श्रध्दा कपूरच्या आगामी 'बागी ३' चित्रपटातील भंकस या वेडिंग सॉन्गवर सर्वच कलाकार थिरकताना दिसत आहेत. हे गाणे १९८४ मध्ये आलेल्या 'तोहफा' या चित्रपटातील 'एक आंख मारु' या गाण्याचे रिक्रिएशन आहे. मुळ गाण्यात जितेंद्र आणि श्रीदेवींनी कमालीचा डान्स केला होता.

टायगर श्रॉफवने हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये टायगर लिहितो, 'जब रोनी और सिया के मूव्स पर होंगे सब वारी, तब बजेगा ढोल और नाचेगी दुनिया सारी. भंकस सॉन्ग आउट नाउ.'

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रितेश देशमुखनेही हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

२ मिनिटे आणि २६ सेकंदाच्या या गाण्यावर श्रध्दा, टायगर, रितेश आणि अंकिता लोखंडे थिरकताना दिसत आहेत.

काही दिवसापूर्वी 'बागी ३' चा ट्रेलर रिलीज झाला होता. त्याला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. या ट्रेलरमध्ये रॉनी ( टायगर ) आपल्या भावावर ( रितेश ) आलेल्या संकटाशी सर्व स्तरावर लढताना दिसत आहे. श्रद्धानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'विक्रम' आणि 'रॉनी' या दोन्ही भावाचा खास बॉन्ड दाखवण्यात आला आहे. विक्रम कोणत्याही कठीण परिस्थितीत अडकला, तर 'रॉनी' त्याला त्यामधून सोडवत असतो. पुढे काही कामानिमित्त विक्रम सिरियाला जातो. तिथे काही लोक त्याचे अपहरण करतात. त्याला सोडवण्यासाठी 'रॉनी' गुंडांशी कसा लढतो? 'रॉनी' त्याच्या भावाला वाचवू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं ६ मार्चला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळतील.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.