मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर 'द झोया फॅक्टर' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत दिसेल. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरवरुन येतो. यानंतर आता या सिनेमाचा टीझरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
४१ सेकंदाच्या या टीझरची सुरुवात होते, पंकज धीर यांच्यापासून. यात ते लकी चार्म म्हणून जोया कवच विकताना दिसतात. यात चांगल्या नशीबासाठी हे कवच विक्री करण्याच्या अनेक जाहिराती पाहायला मिळतात. या कवचमध्ये सोनमचा क्रिकेटच्या देवीच्या लूकमधील फोटो पाहायला मिळतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यावरुन इतकं तर नक्की, की हा सिनेमा एक वेगळा आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनमनं हा टीझर शेअर करत याला कॅप्शन दिलं आहे. माझ्या यशस्वी होण्यामागे काही रहस्य नाहीये. ही सगळी तर जोया कवचची जादू आहे, असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या सिनेमात सलमान दुलकरही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. येत्या २७ ऑगस्टला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.