ETV Bharat / sitara

Vivek Agnihotri Y security : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा

'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक ( The Kashmir Files director ) विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. दिग्दर्शकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासोबत चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले आहेत. विवेक यांच्या घरापासून ते संपूर्ण भारतात ते जिथे जातील तिथे त्याच्यासोबत 'वाय' सुरक्षा *(Y category security ) असेल.

विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री
author img

By

Published : Mar 18, 2022, 3:19 PM IST

मुंबई - 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक ( The Kashmir Files director ) विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri ) यांना वाय श्रेणीची सुरक्षा ( Y category security ) देण्यात आली आहे. 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट सध्या देशभर चर्चेत असून लोकांच्या त्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटाबाबत देशातील वातावरण सामान्य नाही. याप्रकरणी विवेक अग्निहोत्री यांना अनेकदा धमक्याही आल्या आहेत. अशा परिस्थितीत दिग्दर्शकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासोबत चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले आहेत. विवेक यांच्या घरापासून ते संपूर्ण भारतात ते जिथे जातील तिथे वाय श्रेणीची सुरक्षा त्याच्यासोबत असेल.

  • Film director Vivek Agnihotri has been given 'Y' category security with CRPF cover pan India: Government Sources

    (File photo) pic.twitter.com/63l1B0BlMz

    — ANI (@ANI) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात कश्मीरी पंडितांचे हत्याकांड आणि पलायनाची वेदना मांडली आहे. काही लोक या चित्रपटाबाबत तत्कालीन सरकारवर नाराज आहेत, तर काहीजण याला मुस्लिमविरोधी म्हणत आहेत. चित्रपटावरून राजकारण पूर्णपणे तापले आहे. चित्रपटावर गप्प बसलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर लोक संताप व्यक्त करत आहेत.

वाय श्रेणीची सुरक्षा का मिळाली?

'द कश्मीर फाईल्स'वरून देशात वातावरण तापले असून त्याची झळ राजकारणापर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या चित्रपटासाठी विवेकचे कौतुक केले आहे. चित्रपटामुळे वातावरण बिघडल्यामुळे दिग्दर्शकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना वाय सुरक्षेची सुरक्षा देण्यात आली आहे.

हेही वाचा - संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ एकाच फोटोत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.