ETV Bharat / sitara

अरबाज खान व विक्रम गोखले अभिनित ‘रिटर्न तिकिट’चे टीझर पोस्टर झाले प्रदर्शित!

'बलात्कार' या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेलेत. परंतु, या चित्रपटात त्या विषयाला अत्यंत वेगळेपणाने सादर करण्यात येणार आहे. असं म्हणतात की केलेल्या कुकर्मांचे फळ नियती देतेच. पण ३० वर्षांनंतर तशा कुकृत्याला शिक्षा मिळाली तर काय म्हणाल? रिटर्न तिकिटआफ्टर थर्टी इयर्स हा चित्रपटही अशाच एका संकल्पनेवर आधारित आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

रिटर्न तिकीट टीझर पोस्टर प्रदर्शित
रिटर्न तिकीट टीझर पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:48 PM IST

मुंबई - ‘एक रिटर्न तिकीट द्या’ हे वाक्य सध्या रेल्वे खिडकीवर ऐकायला मिळत नाही. कारण साधारण गेले वर्षभर मुंबईतील लोकल सामान्यजनांसाठी उपलब्ध नसल्यामुळे. पण नुकतेच ‘रिटर्न तिकीट’ हे शब्द ऐकायला मिळाले, एका पंचतारांकित हॉटेलात. एक नवीन पिक्चर येऊ घातलाय ज्याचे नाव आहे, ‘रिटर्न तिकिट आफ्टर थर्टी इयर्स’ व त्याचे टीझर-पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

रिटर्न तिकीट टीझर पोस्टर प्रदर्शित
रिटर्न तिकीटचे टीझर पोस्टर प्रदर्शित
'बलात्कार' या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेलेत. परंतु, या चित्रपटात त्या विषयाला अत्यंत वेगळेपणाने सादर करण्यात येणार आहे. असं म्हणतात की केलेल्या कुकर्मांचे फळ नियती देतेच. पण ३० वर्षांनंतर तशा कुकृत्याला शिक्षा मिळाली तर काय म्हणाल? रिटर्न तिकिटआफ्टर थर्टी इयर्स हा चित्रपटही अशाच एका संकल्पनेवर आधारित आहे. या चित्रपटात अरबाज खान, गुरलीन चोपडा, देव शर्मा, श्वेता तिवारी, अध्ययन सुमन, मुग्धा गोडसे, आसिफ तांबे, अमित जे. शर्मा, नीलम गुप्ता, रुस्लान मुमताज, असीमा भट्ट, राज कपूर साही, अश्विनी कृष्णा, पंकज झा आणि विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. निशांत जीके रंजन दिग्दर्शन करणार आहेत. प्रत्युष द्विवेदी यांनी कथा लिहिली असून, हा चित्रपट मूठभर लोकांना पण उभारी देऊन गेला तर आम्ही धन्य समजू, असे यावेळी नमूद करण्यात आले.
रिटर्न तिकीट टीझर पोस्टर प्रदर्शित
रिटर्न तिकीटचे टीझर पोस्टर प्रदर्शित

हेही वाचा - प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी येताहेत नवीन, फ्रेश, अनोख्या ऑन-स्क्रीन जोड्या!

यावेळी अभिनेता अरबाज खान म्हणाला की, ‘जेव्हा दिग्दर्शक निशांतने मला या चित्रपटाची कहाणी आणि भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा मला वाटलं की बलात्कार पीडितांना न्याय देण्याची ही संधी आहे म्हणून मी ही ऑफर स्वीकारली. आपण बर्‍याचदा ऐकले आहे की बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही आणि उलट त्यांना समाजात गुन्हेगारांसारखे वागविले जाते म्हणूनच हा चित्रपट समाजजागृती करण्यास मदत करेल असे मला वाटते. चित्रपटाच्या व्यक्तिरेखेबद्दल मी खूप उत्साही आहे, कारण मला भूमिकेतील ३० वर्षांचा प्रवास अनुभवता येईल.’

दिग्दर्शक निशांत जी के रंजन म्हणाले की, ‘चित्रपटाची कहाणी गेली दहा वर्षे माझ्या मनात तडफडत होती. हा चित्रपट सामाजिक त्रुटींकडे लक्ष वेधतो. आम्ही एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. रिटर्न तिकिट चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारीमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात आणि नवी दिल्ली येथे सुरू होईल.’

चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते अमित वर्मा, कास्टिंग डायरेक्टर चिराग खान, कार्यकारी निर्माता दीपक प्रजापत, सह क्रिएटिव्ह निर्माता श्रवण पुंडिक, सर्जनशील दिग्दर्शक नितीश श्रीवास्तव आणि अंकित आनंद, छायाचित्रकार महेश अने, संगीत दिग्दर्शक अँड्रिन अल्ब्रेक्ट आणि फर्नांडो नोरिएगा, गीतकार श्रवण पुंडिर आणि अजय गर्ग आहेत. गुंजन मोहन यांची वेशभूषा असून संकलक धर्मेश पटेल आहेत.

‘रिटर्न तिकिट आफ्टर थर्टी इयर्स’ याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - कैलास खेर म्हणतोय "जनता के सेवक है हम"!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.