ETV Bharat / sitara

आयुष्मानच्या 'बाला'चा रंजक टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - दिनेश विजन

आयुष्मानच्या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाचा आता बालाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेचं आयुष्मान या सिनेमातूनही वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं टीझरमधून जाणवतं.

आयुष्मानच्या 'बाला'चा रंजक टीझर प्रदर्शित
author img

By

Published : Aug 26, 2019, 5:15 PM IST

मुंबई - 'विकी डोनर' फेम अभिनेता आयुष्मान खुराणा आणि यामी गौतम हे दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. बाला या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. तर या दोघांशिवाय चित्रपटात भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत झळकणार असून आयुष्मानसोबतचा हा तिचा तिसरा चित्रपट असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता आयुष्मानच्या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाचा आता 'बाला'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेचं आयुष्मान या सिनेमातूनही वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं टीझरमधून जाणवतं.

चित्रपटात आयुष्मान युवावस्थेत टक्कल पडलेल्या एका तरुणाची भूमिका साकारणार आहे. टीझरच्या सुरुवातीलाच तो दुचाकीवर बसून एक प्रेम गीत म्हणत चाललेला असल्याचं दिसतं. मात्र, काही वेळातच हवेने त्याच्या डोक्यातील टोपी उडून जाते आणि यानंतर युवावस्थेत पडलेल्या टक्कलमुळे प्रेमाची सगळी स्वप्न चूर झालेला आयुष्मान 'रहने दो छोडो, हम ना करेंगे प्यार' हे गाणं गाताना दिसतो. टीझरवरुनच हा सिनेमा विनोदी असणार असल्याचे लक्षात येते.

येत्या नोव्हेंबरमध्ये २२ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमर कौशिक यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून दिनेश विजन यांची निर्मिती आहे. चित्रपटात या त्रिकूटाशिवाय सौरभ शुक्ला, जावेद जाफरी आणि सीमा पहवा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.