ETV Bharat / sitara

'रश्मी रॉकेट'मध्ये रॉकेटसारखी धावणार तापसी पन्नू

नोव्हेंबरपासून तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा एका मुलीवर आधारित आहे, जिला देवाने वेगवान धावण्याचे वरदान दिले आहे. म्हणूनच गावकरी त्या मुलीला रॉकेट म्हणतात.

Tapsi Pannu
तापसी पन्नू
author img

By

Published : Aug 21, 2020, 3:48 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिची भूमिका असलेल्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाची कथा एका गावातील मुलीची आहे. वेगात धावण्यासाठी ईश्वराने तिला वरदान मिळाले आहे.

या अतुलनीय क्षमतेमुळे गावकरी तिला रॉकेटच्या नावाने ओळखतात. जेव्हा तिला व्यावसायिकपणे आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते तेव्हा ती ही संधी तिच्या हातातून जाऊ देत नाही. फिनीश लाईनपर्यंत धावण्यात अनेक अडथळे आहेत याची तिला जाणीव होते. अ‍ॅथलेटिक स्पर्धेसारखी दिसणारी ही शर्यत, सन्मान, आदर आणि अगदी स्वतःच्या ओळखीसाठी वैयक्तिक लढाईत रुपांतरित होते.

'रश्मी रॉकेट' या चित्रपटाची कथा नंदा परियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना करणार आहेत.

आकर्ष या चित्रपटाविषयी म्हणतात की, "जेव्हा कोरोना साथीचा आजार सर्वत्र सुरु झाला तेव्हा आम्ही सर्व शुटिंगसाठी तयार होतो. लवकरच आम्ही पुन्हा शुटिंग सुरू करत आहोत याचा मला आनंद आहे. माझी टीम आणि मी हा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत. यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत. ही एक अद्भुत कथा तुम्हाला सांगण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. "

तापसी पन्नू सांगतात, "मी या प्रोजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सामील आहे आणि म्हणूनच ती माझ्यासाठी खूप खास आहे. साथीच्या आजार सुरू होण्यापूर्वी मी एका स्प्रींटरच्या भूमिकेत जाण्यासाठी 3 महिने प्रशिक्षण घेत होते. हा बऱ्याच काळाचा मोठा ब्रेक झाला आहे, परंतु या विषयामुळे मी पुन्हा एकदा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे."

हेही वाचा - ह्रतिकसोबतच्या नात्याबद्दल ट्विट करणाऱ्या कंगना रनौतवर भडकले चाहते

'एक्सट्रॅक्शन' फेम प्रियांशु या चित्रपटात तापसीसमवेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाविषयी म्हणतात की, "'रश्मी रॉकेट' ही संघर्षाची कहाणी आहे जी बर्‍याच महिला अ‌ॅथलिट्सना त्यांच्या मार्गावर भेडसावत असते आणि त्याचबरोबर आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उत्कटतेचेही दर्शन यात घडवण्यात येईल. या चित्रपटात तापसीशिवाय दुसरी उत्तम कलाकार असू शकत नव्हती. लॉकडाऊननंतर आम्ही आरएसव्हीपीद्वारे पुन्हा शुटिंग सुरू करण्यास उत्सुक आहोत. "

'देव डी ',' लुटेरा ',' क्वीन ',' केदारनाथ ' यासारख्या चित्रपटात संगीत देणारे अमित त्रिवेदी आता' रश्मी रॉकेट 'मध्ये आपल्या संगीताची जादू दाखवतील. नेहा आनंद आणि प्रांजल यांच्यासह रॉनी स्क्रूवाला निर्मित' रश्मी रॉकेट ' 2021 मध्ये रिलीज होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.