ETV Bharat / sitara

तापसी पन्नू व गुलशन देवय्या नैनितालमध्ये करताहेत 'ब्लर'चे शुटिंग

तापसी पन्नूचे लॉकडाऊननंतर पहिले प्रॉडक्शन ‘ब्लर’ असून त्यात ती गुलशन देवय्या सोबत दिसेल. तापसी पन्नूने गुलशन देवाय्यासोबत या चित्रपटाचे नैनितालमध्ये शूटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'ब्लर'चे शुटिंग
'ब्लर'चे शुटिंग
author img

By

Published : Aug 21, 2021, 3:09 PM IST

तापसी पन्नूने मागील महिन्यात आपले प्रॉडक्शन हाउस आउटसाईडर्स फिल्म्सचे अनावरण केले. तिचे पहिले प्रॉडक्शन ‘ब्लर’ असून त्यात ती गुलशन देवाय्या सोबत दिसेल. तापसी पन्नूने गुलशन देवय्यासोबत या चित्रपटाचे नैनितालमध्ये शूटिंग सुरू केले आहे. या दोघांनी तापसीच्या निर्मिती पदार्पणाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाची चित्रे शेअर केली. तापसी पन्नूने तिच्या भूमिकेची तयारी करताना स्वतःचे एक छायाचित्र पोस्ट केले, तर गुलशन देवायाने स्वतःचे एक चित्र शेअर केले आणि लिहिले, "मिस्टर अँड मिसेस ब्लर." या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल करीत असून त्याने नैनीतालमध्ये शूट करण्याचा आपला अनुभव शेअर केला आहे.

'ब्लर'चे शुटिंग
'ब्लर'चे शुटिंग

अजय बहल म्हणाले की, ‘'ब्लर’ ची टीम लोकेशनवर जास्त गर्दी असल्याकारणाने रात्री शूटिंग करत होती. नैनीताल कदाचित भारतातील पर्यटकांनी गजबजलेल्या सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे. 'ब्लर'च्या स्क्रिप्टला या अशाच लॅंडस्केपची गरज होती आणि आम्ही शूटिंगसाठी मॉल रोड आणि नैनीताल झीलसारख्या सुयोग्य जागा यासाठी निवडल्या होत्या. नैनीताल झील आणि मॉल रोडसारख्या स्थानांवर करण्यात आलेले शूटिंग सुंदर प्राकृतिक दृश्यांचे संकेत देतात जे दर्शकांना चित्रपट बघताना नक्कीच जाणवेल.''

तापसी पन्नू व गुलशन देवाय्या
तापसी पन्नू व गुलशन देवाय्या

अजय बहल यांनी पुढे सांगितले की, "नैनीताल झील आणि मॉल रोड या दोन्ही जागा स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी गजबजलेल्या असतात आणि तापसीसारख्या लोकप्रिय कलाकारासोबत अशा वास्तविक स्थानांवर शूटिंग करणे खरोखरच आव्हानात्मक होते. मात्र इथल्या स्थानिकांनी संयम बाळगला, शूटिंग संपेपर्यंत सेल्फी घेणे किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी वाट पाहिली. मला या शहरातील लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी आमच्या या शूटिंगसाठी याला इतके सुविधाजनक बनवले."

'ब्लर'चे शुटिंग
'ब्लर'चे शुटिंग

'ब्लर’ हा तापसी पन्नूचा नुकत्याच लॉन्च झालेला प्रॉडक्शन हाऊस ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ चा पहिला प्रोजेक्ट आहे. अजय बहल दिग्दर्शित ‘ब्लर’ मध्ये तापसी आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - नीरज चोप्रासमोर रेडिओ स्टेशनमधील मुलींचा ''उड़े जब जब जुल्फें तेरी...'' गाण्यावर डान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.