ETV Bharat / sitara

‘लूप लपेटा’च्या सेटवर तापसी पन्नूची अनोखी ‘आत्मनिर्भरता’! - अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या कृतीतून आत्मनिर्भरता दाखवून दिली. ‘लूप लपेटा’च्या चित्रीकरणासाठी तापसी सध्या गोव्यात आहे. तेथील शूटिंगचे लोकेशन अशा ठिकाणी आहे जेथे व्हॅनिटी व्हॅन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाहीये. यासाठी ती स्कूटवरुन लोकेशनवर पोहोचत असते.

tapasi-pannus
अभिनेत्री तापसी पन्नू
author img

By

Published : Feb 15, 2021, 4:05 PM IST

‘आत्मनिर्भर’ हा शब्द आता ऑक्सफर्ड च्या डिक्शनरीमध्येसुद्धा समाविष्ट झाला आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या कृतीतून आत्मनिर्भरता दाखवून दिली. ‘लूप लपेटा’च्या चित्रीकरणासाठी तापसी सध्या गोव्यात आहे. तेथील शूटिंगचे लोकेशन अशा ठिकाणी आहे जेथे व्हॅनिटी व्हॅन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाहीये. थोडक्यात चित्रपटाच्या सेटपासून व्हॅनिटी व्हॅन बऱ्याच लांब पार्क करावी लागते. त्या रस्त्याने कारने प्रवास करणेही कठीण असल्यामुळे तापसीने शक्कल लढविली. ती ते अंतर आता प्रॉडक्शनच्या स्कुटीवरून प्रवास करून कापते. महत्वाचं म्हणजे ती शूटिंगचे कपडे घालून स्वतः स्कुटर चालवीत ये-जा करते. अजूनही छान गोष्ट म्हणजे तापसी आपल्या मेकअपमनला डबल सीट घेऊन येते-जाते.

‘लूप लपेटा’च्या सेटवर तापसी पन्नू
‘लूप लपेटा’ च्या चित्रीकरणाचे हे शेवटचे शेड्युल असून तापसीला ते पूर्ण करून पुढच्या चित्रपटाच्या शूटकडे वळायचे आहे. त्यातच कुठल्याही कारणामुळे तिच्यामुळे चित्रीकरणात दिरंगाई होऊ नये असे तिचे मत आहे. तापसीची प्रॉडक्शनबद्दलची तळमळ बघून निर्माते तनुज गर्ग आत्यंतिक खुश असून त्यांनी तापसीचा प्रोफेशनलिझम सर्वांना कळावा म्हणून तिचा स्कुटर चालवतानाचा व्हिडीओ आपल्या समाज माध्यम हॅण्डलवर पोस्ट केला व अनेकांनी तापसीच्या स्टार असूनही पाय जमिनीवर असण्याच्या कृतीचे तोंडभरून कौतुक केले आहे. तापसीने सुद्धा ती पोस्ट आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर रिपोस्ट करताना लिहिले, ‘गरज एका वेगळ्या प्रकारच्या दळणवळणाची, जेव्हा शूटिंग स्पॉट आणि व्हॅनिटी व्हॅन मधील अंतर खूप असते’. जर्मन फिल्म ‘रन लोला रन’ चा अधिकृत रिमेक असणाऱ्या ‘लूप लपेटा’ चे दिग्दर्शन ऍड फिल्ममेकर आकाश भाटिया करीत असून सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलईप्सिस एंटरटेनमेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर) आणि आयुष माहेश्वरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही - 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांचं ‘ये नयन डरे डरे’ प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.