ETV Bharat / sitara

'बिग बॉस'बद्दल म्हणाली तापसी, ''असा हिंसक शो लोक कसे काय पाहू शकतात?''

author img

By

Published : Feb 6, 2020, 6:40 PM IST

सध्या 'बिग बॉस'च्या १३ व्या पर्वात सुरू असलेल्या भांडण-तंट्यांना पाहून तापसी पन्नूने आपली नाराजी बोलून दाखवली. म्हणाली, असा शो तुम्हाला कसा काय आवडू शकतो?

Tapasi Pannu on Bigg Boss  violence
तापसी पन्नू

मुंबई - टीव्हीवर सध्या 'बिग बॉस'चा १३ वा हंगाम सुरू आहे. या शोमध्ये भांडण तंटे काही नवीन नाहीत. यावेळीही स्पर्धकांमध्ये अत्यंत तणावाचे आणि भांडणाचे वातावरण आहे. यात हिंसेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशावेळी अभिनेत्री तापसी पन्नूने हा शो आवडणाऱ्या प्रेक्षकांबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय.

तापसीच्या आगामी 'थप्पड' सिनेमामध्ये घरगुती हिंसेचा विषय हाताळण्यात आलाय. 'थप्पड'च्या प्रमोशनमध्ये बोलत असताना तिने 'बिग बॉस'मध्ये सुरू असलेल्या हिंसेचा उल्लेख केला.

तापसी म्हणाली, ''लोक अशा प्रकारच्या हिंसेचा आनंद घेत आहेत? ही चेष्टा नाही. हे जर आपल्यासोबत घडले तर मजा नाही येणार. हे दुसऱ्यांसोबत आहे तोवर हे मजेशीर आहे.''

Tapasi Pannu on Bigg Boss  violence
असा हिंसक शो लोक कसे काय पाहू शकतात?

ती पुढे म्हणाली, ''कुणासोबतही घडणारी घटना मनोरंजन म्हणून पाहाता कामा नये. ज्याच्यासोबत ही हिंसा होत आहे त्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहा. तेव्हा आपला दृष्टीकोन बदलेल. मला माहिती आहे याला फार वेळ लागेल. पण याची सुरुवात तर केलीच पाहिजे.''

'बिग बॉस १३' कडे इशारा करीत ती म्हणाला, ''याला लोक मनोरंजन म्हणून पाहतात म्हणून मी याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अशा गोष्टी पाहू नयेत आणि त्याला पाठिंबाही देऊ नये.''

Tapasi Pannu on Bigg Boss  violence
असा हिंसक शो लोक कसे काय पाहू शकतात?

अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी 'थप्पड' हा चित्रपट महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. एखाद्या नात्यात बंदिस्त झाल्यावर एका चापटीमुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे बदलते, याची झलक यामध्ये पाहायला मिळते. महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटना नेहमी आपल्या जवळपास घडत असतात. एखाद्या कारणावरून स्त्रियांवर हात उचलणे, तिला मारहाण करणे या गोष्टी सहज घडतात. मात्र, त्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. समाजाच्या भीतीमुळे किंवा नातं टिकवून ठेवण्यासाठी अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात. पण एक थप्पडही तो मारू शकत नाही, तशी मारण्याचा त्याला काही अधिकार पोहोचत नाही, हेच या सिमेमामधून दाखवण्यात आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तापसीसोबत यामध्ये रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.