मुंबई - दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'खामोशी' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये तमन्नाचा लूक पाहायला मिळत आहे. तर प्रभूदेवाचा अर्धवट चेहरा दिसत आहे. त्यामुळे, चित्रपटातील प्रभूदेवाच्या लूकसाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. फर्स्ट लूकसोबतच चित्रपाटची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. येत्या ३१ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चक्री टॉलेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.