ETV Bharat / sitara

तापसी पन्नू, ताहिर राज भसीनच्या 'लूप लपेटा'ची रिलीज तारीख ठरली - रन लोला रनचा हिंदी रिमेक

२२ ऑक्टोबर रोजी तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांच्या भूमिका असलेला 'लूप लपेटा' चित्रपट रिलीज होणार आहे. अ‍ॅड फिल्ममेकर आकाश भाटिया दिग्दर्शित हा चित्रपट जर्मन थ्रिलर 'रन लोला रन' या चित्रपटाचे हिंदी रूपांतर आहे.

Looop Lapeta gets release date
'लूप लपेटा'ची रिलीज तारीख ठरली
author img

By

Published : Mar 9, 2021, 12:27 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांनी आपल्या लूप लपेटा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. २२ ऑक्टोबरला हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे.

तापसी आणि ताहिरने एक १२ सेकंदाचा व्हिडिओ शेअर करुन 'सावी' आणि 'सत्या' भेटीस येत असल्याचे म्हटलंय. तसेच 'लूप लपेटा' हा कॉमिक थ्रिलर चित्रपट २२ ऑक्टोबरला सिनेमागृहात झळकणार असल्याचे सांगितले आहे.

ताहिरने लिहिलंय, "सावी आणि सत्यासोबत आपल्या 'जीवना'च्या प्रवासासाठी सज्ज व्हा ... २२ ऑक्टोबर २०२१ रोजी थिएटरमध्ये # लूप लॅपेटा!"

तापसीने नेहमीच चित्रपटातील फोटो पोस्ट करीत चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. आकाश भाटिया दिग्दर्शित हा चित्रपट १९९८ च्या जर्मन चित्रपटाचा हिंदी रूपांतर आहे. 'लूप लपेटा' चित्रपटाशिवाय तापसी पन्नू आगामी 'हसीन दिलरुबा' या चित्रपटातही काम करीत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. त्यानंतर ती 'रश्मी रॉकेट' या खेळावर आधारित चित्रपटात व मिताली राजच्या जीवनावर आधारित 'शाब्बास मितु' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तापसी पन्नू 'दोबारा' या अनुराग कश्यपच्या चित्रपटाचेही शुटिंग करीत आहे.

अलिकडेच प्राप्तिकर विभागाने तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची घरे आणि कार्यालये यावर छापा टाकला होता. यात 'फॅन्टम फिल्म्स' या प्रॉडक्शन हाऊसच्या आर्थिक व्यवहाराचीही चौकशी करण्यात आली होती. दोघांनीही आता आपल्या शुटिंगला पूर्ववत सुरुवात केली आहे.

हेही वाचा - शार्लिन चोप्राला अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.