मुंबई - आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर यावेळी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वराच्या ब्रेकअपविषयीच्या बातम्या समोर येत होत्या. हिमांशू शर्मा याच्यासोबतचं रिलेशनशिप तोडल्यानंतर आता स्वराच्या आयुष्यात नव्यानं प्रेम फुलल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा सध्या दिवंगत अभिनेते गिरिश कर्नाड यांचा मुलगा आणि पत्रकार तसेच लेखक रघू कर्नाडला डेट करत असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा या जोडीला एकत्र स्पॉटदेखील केलं गेलं आहे.
दरम्यान गेल्या ५ वर्षांपासून स्वरा भास्कर आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांशु शर्मा हे रिलेशनशिपमध्ये होते. स्वरानं हिमांशुची पटकथा असलेल्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इथूनच दोघांच्या नात्याची सुरुवात झाली, मात्र हे नात जास्त काळ टीकू शकलं नाही.