ETV Bharat / sitara

युजरने स्वराला म्हटलं कॉल गर्ल, मुंबई पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत केलं ट्विट

नुकतंच शबाना आझमी यांनी सरकारविरोधात बोलणाऱ्याला थेट देशद्रोही ठरवले जाते, असे विधान केले होते. यावेळी त्यांच्या मताशी सहमत होत स्वराने त्यांना पाठिंबा दिला होता. यावरूनच स्वराला ट्रोल करत यूजरने तिला कॉल गर्ल म्हणत तिच्याबद्दल असभ्य भाषा वापरली होती.

युजरने स्वराला म्हटलं कॉल गर्ल
author img

By

Published : Jul 10, 2019, 8:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री स्वरा भास्कर चित्रपटांहूनही अधिक आपल्या परखड बोलण्याने चर्चेत असते. याच बोलण्यामुळे स्वाराला अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकांचा सामनाही करावा लागतो आणि या टीकांना स्वरा सडेतोड उत्तरही देत असते. मात्र, यावेळी स्वरावर होणाऱ्या टीकेची दखल खुद्द मुंबई पोलिसांनीही घेतली आहे.

नुकतंच शबाना आझमी यांनी सरकारविरोधात बोलणाऱ्याला थेट देशद्रोही ठरवले जाते, असे विधान केले होते. यावेळी त्यांच्या मताशी सहमत होत स्वराने त्यांना पाठिंबा दिला होता. यावरूनच स्वराला ट्रोल करत यूजरने तिला कॉल गर्ल म्हणत तिच्याबद्दल असभ्य भाषा वापरली होती.

या ट्विटचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकत स्वराने मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. मुंबई पोलिसांनेही या प्रकरणाची दखल घेत, आम्ही तुला फॉलो करत आहोत. तू तुझा नंबर दे, आम्ही प्राधान्याने हे प्रकरण हाताळू, असे ट्विट केले आहे. यानंतर स्वराने मुंबई पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करत आभार मानले आहेत.

  • In his own words ‘mad, proud and fortunate nationalist & Hindu’ bringing shame upon his (and my) religion and nation! Also I think this qualifies as harassment or Eve teasing or something @MumbaiPolice 🙏🏿🙏🏿🙏🏿 pic.twitter.com/iBzeNN2AEx

    — Swara Bhasker (@ReallySwara) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.