पाटणा - सुशांतसिंह राजपूतचे निकटवर्तीय असलेल्या बिहार भाजपचे आमदार नीरजकुमार सिंग ऊर्फ बबलू यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुशांतच्या शोकग्रस्त वडिलांविषयी वादग्रस्त भाष्य केल्याबद्दल बुधवारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. 48 तासांच्या आत माफी मागितली पाहिजे असे त्यांनी म्हटलंय.
-
राज कुमार का एक डायलॉग आज मुझे बहोत याद आ रहा है......
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"चिनाय सेठ...,
जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते.."
समझने वालोंको इशारा काफी है!!!!
जय महाराष्ट्र!
">राज कुमार का एक डायलॉग आज मुझे बहोत याद आ रहा है......
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 3, 2020
"चिनाय सेठ...,
जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते.."
समझने वालोंको इशारा काफी है!!!!
जय महाराष्ट्र!राज कुमार का एक डायलॉग आज मुझे बहोत याद आ रहा है......
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 3, 2020
"चिनाय सेठ...,
जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते.."
समझने वालोंको इशारा काफी है!!!!
जय महाराष्ट्र!
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांसमवेत आमदार नीरजकुमार सिंग ऊर्फ बबलू हे मुंबईला आले होते. संजय राऊत यांचा माझ्यावर प्रभाव होता. मात्र आता त्यांनी केलेल्या विधानामुळे तिरस्कार वाटत असल्याचे बबलू यांनी म्हटलंय.
अलिकडेच सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न त्याला मान्य नव्हते. त्यामुळे त्याचे भावनिक नाते उरले नव्हते असे लिहिले होते. यावर आता आमदार नीरजकुमार सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे आणि राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केलेले नाही. त्यामुळे राऊत यांच्या या लिखानावर सुशांत कुटुंबियांकडून आक्षेप घेतला जात आहे. आता या नोटीसीला राऊत काय उत्तर देतात हे लवकरच स्पष्ट होईल.