मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिली. त्यानंतर एजन्सीचे विशेष तपास पथक आज मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाचे प्रमुख सीबीआय पोलीस अधीक्षक (एसपी) नुपूर प्रसाद आहेत.
-
#WATCH Maharashtra: Central Bureau of Investigation (CBI) team that will probe #SushantSinghRajput case, arrives in Mumbai. pic.twitter.com/3Bixojqnj6
— ANI (@ANI) August 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Maharashtra: Central Bureau of Investigation (CBI) team that will probe #SushantSinghRajput case, arrives in Mumbai. pic.twitter.com/3Bixojqnj6
— ANI (@ANI) August 20, 2020#WATCH Maharashtra: Central Bureau of Investigation (CBI) team that will probe #SushantSinghRajput case, arrives in Mumbai. pic.twitter.com/3Bixojqnj6
— ANI (@ANI) August 20, 2020
मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रे सीबीआय पथक गोळा करेल आणि ते सुशांत प्रकरण हाताळणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनाही भेटतील. गरज भासल्यास हे पथक मुंबई पोलिसांच्या डीसीपींशीही बोलतील.
एजन्सीचे अधिकारी सुशांतच्या वांद्रे येथील घरी देखील भेट देऊ शकतात, जिथे तो 14 जून रोजी मृत अवस्थेत आढळला होता. या पथकाने मृत्यूनंतर आलेल्या पाच लोकांना बोलावले आहे. ही टीम सुशांतची बहीण मितू सिंह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
25 जुलै रोजी सुशांतचे वडील केके सिंह यांनी बिहार पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि फ्लॅटसोबती सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील आणि त्याची मोठी बहीण राणी सिंह यांचेही जवाब सीबीआयने नोंदवले आहेत.