अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सुशांतचा मित्र आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या ओटीटी प्लेटफॉर्मच सबस्क्रीबशन घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोन्ही प्रेक्षकांना सुशांतचा हा अखेरचा सिनेमा पाहता येणार आहे.
-
IT'S OFFICIAL... #DilBechara - starring #SushantSinghRajput - will have a digital release... Will premiere on #DisneyPlusHotstar on 24 July 2020... Costars #SanjanaSanghi and #SaifAliKhan in a special role... Directed by Mukesh Chhabra. pic.twitter.com/okiA7uU2gA
— taran adarsh (@taran_adarsh) June 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... #DilBechara - starring #SushantSinghRajput - will have a digital release... Will premiere on #DisneyPlusHotstar on 24 July 2020... Costars #SanjanaSanghi and #SaifAliKhan in a special role... Directed by Mukesh Chhabra. pic.twitter.com/okiA7uU2gA
— taran adarsh (@taran_adarsh) June 25, 2020IT'S OFFICIAL... #DilBechara - starring #SushantSinghRajput - will have a digital release... Will premiere on #DisneyPlusHotstar on 24 July 2020... Costars #SanjanaSanghi and #SaifAliKhan in a special role... Directed by Mukesh Chhabra. pic.twitter.com/okiA7uU2gA
— taran adarsh (@taran_adarsh) June 25, 2020
ट्रेंड पंडित तरन आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि नवोदित संजना संघी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. मुकेश छाबडा यांनीच सुशांतचा नाव त्याचा पहिला वहिला सिनेमा 'काय पो छे' साठी दिग्दर्शक अभिषेक कपूर याना सुचवलं होतं. त्यानंतर सुशांत स्टार झाला. मात्र, या दोघांनी मुकेशचा पहिला सिनेमा एकत्र करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार मुकेश यांच्या 'दिल बेचारा' या दिग्दर्शक म्हणून पदार्पण असलेल्या सिनेमात सुशांतने काम करायला होकार दिला होता.
मुकेश यांनी आज ही बातमी देताना देखील त्याच जुन्या आठवणींना एका पोस्ट द्वारे उजाळा दिला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की 'आपण दोघांनी मिळून एका सिनेमात काम करायचं स्वप्न पहिलं होतं. त्यानुसार तू माझ्या 'दिल बेचारा' या सिनेमात काम केलंस. मात्र, हा सिनेमा अशापद्धतीने तुझ्याशिवाय रिलीज करायची वेळ माझ्यावर येईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आता तुझी अखेरची आठवण म्हणून तुझी ही कलाकृती तुझ्या करोडो फॅन्सना पाहायला मिळणार आहे. मला वाटतं तू जिथे कुठे असशील तिथून ही बातमी ऐकून तुझ्या चेहऱ्यावर ते निरागस हास्य पुन्हा एकदा उमटले असेल.'
सुशांतच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय, मित्र मैत्रिणी आणि त्याच्या फॅन्सना देखील मोठा धक्का बसला होता. मात्र, आता या निर्णयामुळे त्यांना आपल्या लाडक्या कलाकाराची अखेरची कलाकृती डोळे भरून पाहता येऊ शकेल.