ETV Bharat / sitara

...तर सुशांतसिंह राजपूत जीवंत असता? - sushant singh raput latest news

सुशांतसिंहच्या निधनानंतर अचानक हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. सुशांतला असे कधीच वाटले नसेल की करियरमध्ये अॅक्टिंगशिवाय राजकारणाच्या गोष्टींशीही लढा द्यावा लागेल. दुर्दैवाने त्याचा जीव गेला. जर असे घडले नसते तर तर गोष्ट वेगळी झाली असता का?

Sushant Singh Rajput
सुशांतसिंह राजपूत
author img

By

Published : Jun 23, 2020, 5:36 PM IST

मुंबई - सुशांतसिंहच्या निधनानंतर चर्चेला उधाण आले आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे. लोकांचा एक मोठा समुह ज्याच्यात सेलेब्रिटींचाही समावेश आहे, ते सर्व या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्याच्या निधनानंतर देशाच्या विविध भागातून आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. परंतु सुशांतसोबत काय घडले? असे म्हटले जाते की त्याच्या हातून सिनेमा काढून घेतल्यामुळे त्याचे संतुलन बिघडले होते. जर हे घडले नसते तर सुशांतसिंह राजपूतची गोष्ट वेगळी झाली असती का?

Sushant Singh Rajput
संग्रहित छायाचित्र

सुशांत 'आशिकी 2' आणि 'सड़क 2'मध्ये काम करण्यासाठी उत्सुक होता. तो महेश भट्ट यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेला होता आणि अनेक ऑडिशन्सही दिल्या होत्या. हा प्रोजेक्ट त्याला मिळेल, अशी अपेक्षा त्याला होती. परंतु शेवटच्या क्षणी दोन्ही चित्रपट आदित्य रॉय कपूरकडे गेले. यामुळे सुशांत नाराज झाला.

Sushant Singh Rajput
संग्रहित छायाचित्र

'रामलीला' रणवीर सिंहच्या करियरचा टर्निंग पॉईंट होता. यातून त्याचे करियर जमिनीपासून आकाशात झेपावले. परंतु तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटात रणवीरच्या ऐवजी कोण भूमिका करणार होता? अर्थात सुशांतसिंह राजपूत. राम लीला भन्साळीच्या या सिनेमात तो रामची भूमिका करणार होता. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही.

Sushant Singh Rajput
संग्रहित छायाचित्र

हेही वाचा - स्पॉटलेस : अॅसिड हल्ल्यावर आधारित आहे सोनू निगमची शॉर्ट फिल्म

यशराज फिल्म्सच्या बेफिक्रेसाठी सुशांतची निवड पक्की समजली जात होती. परंतु शेवटच्या क्षणी हा चित्रपट रणवीरला मिळाला. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही कलाकारांचा यशराजसोबत करार होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नव्हता.

Sushant Singh Rajput
संग्रहित छायाचित्र

लॉकडाऊननंतर सुशांतच्या आयुष्यावर परिणाम झाला. जर लॉकडाऊन नसता तर सुशांत सिनेमाच्या सेटवर असता. असे नव्हते की त्याच्याकडे काही काम नव्हते. अनेक प्रोजेक्ट्स त्याची प्रतीक्षा करीत होते. मात्र डिप्रेशनने घात केला.

Sushant Singh Rajput
संग्रहित छायाचित्र

सुशांत आणि रिया चक्रवर्ती लवकरच रुमी जाफरी यांच्या आगामी चंदा मामा दूर के या चित्रपटात आघाडीच्या भूमिकेत झळकणार होते. वंदे मातरम या चित्रपटातही तो काम करणार होता. असे असताना तो डिप्रेशनमध्ये का होता? त्याला आगामी सिनेमांची चिंता होती की आणखी कशाची? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Sushant Singh Rajput
संग्रहित छायाचित्र

मृत्यूपूर्वी तो कोणत्या संकटातून जात होता हे कुणालाच माहिती नाही. पोलीस आपल्या पध्दतीने तपास करत आहेत. त्याच्यामुळे इंडस्ट्रीचे किती नुकसान झालंय याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही, कारण नुकसान झालंय हे सर्वांनाच मान्य आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो.

हेही वाचा - सोनू निगमने दिला धोक्याचा इशारा : म्यूझिक इंडस्ट्रीतूनही येऊ शकते आत्महत्येची बातमी, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.