ETV Bharat / sitara

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सेलिब्रेटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची पोलिसांनी केली 5 तास चौकशी - रेश्मा शेट्टीची पोलिसांनी केली 5 तास चौकशी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनासंदर्भात सुरू असलेल्या तपासणीचा एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी सेलिब्रेटी मॅनेजर रेश्मा शेट्टी यांची 5 तास चौकशी केली. पोलिसांनी आतापर्यंत 35 लोकांची जबाब नोंदविले आहेत, ज्यात दिवंगत अभिनेत्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांचा समावेश आहे.

Sushant Singh Rajput death row
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Jul 11, 2020, 6:49 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी प्रसिद्ध सेलिब्रेटी मॅनेजर रेश्मा शेट्टी यांचा जबाब नोंदवला आहे. "मुंबई पोलिसांनी रेश्माची पाच तास चौकशी केली. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येसंदर्भात पोलिसांनी त्यांचे जवाब नोंदवण्यासाठी बोलावले होते", असे एएनआयने ट्विटमध्ये लिहिले आहे.

सलमान खान, अक्षय कुमार आणि आलिया भट्ट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक ए-लिस्टर्समध्ये काम केलेल्या रेश्माची शहरातील वांद्रे पोलीस ठाण्यात पाच तास चौकशी करण्यात आली.

6 जुलै रोजी नामवंत बॉलिवूड चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचाही जबाब नोंदवला होता. त्यांचा जबाब वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तीन तासांनंतर नोंदविण्यात आला आणि त्यावेळी चित्रपट निर्माते भन्साळी यांचे वकील हजर होते. भन्साळी यांनी असे म्हटले होते की, त्यांनी गोलियों की रसलीला : राम-लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तब्बल चार चित्रपटांसाठी राजपूतकडे संपर्क साधला होता.

  • Bandra Police has recorded the statement of Celebrity Manager Reshma Shetty, in questioning which went on for 5 hours. Statements of 35 people have been recorded so far: Mumbai Police on actor #SushantSinghRajput death case pic.twitter.com/2EjCtzwnzI

    — ANI (@ANI) July 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई पोलिसांनी सुशांतचे कुटुंब, कर्मचारी, त्याच्या काही मित्रांची आणि कथित मैत्रीण रिया चक्रवर्ती यांच्यासह चित्रपट निर्माते मुकेश छाबरा आणि अभिनेत्री संजना सांघी यांच्याही जबाबांची नोंद केली आहे.

हेही वाचा - बाहेरच्या लोकांना चित्रपटसृष्टीत आदराने वागवा - कंगना रनौत

सुशांतसिंह राजपूत १४ जूनला मुंबई येथील निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालात त्याचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.

या अभिनेत्याच्या मृत्यूची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत, सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.