ETV Bharat / sitara

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास, 151 कोटी रुपयांची केली कमाई - undefined

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास आहे. 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा व 100 कोटी कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. हिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील कमाई 120.66 कोटी इतकी होती. दुसऱ्या आठवड्या अखेरीस ही कमाई 30. 57 कोटी झाल्याचे तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे. या चित्रपटाने आजवर 151. 23 कोटींची कमाई करीत 2021 मध्ये एक नवा विक्रम स्थापन केला आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास
‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास
author img

By

Published : Nov 15, 2021, 7:49 PM IST

गेल्यावर्षी कोरोना तडाख्यामुळे चित्रपटसृष्टी हतबल झाली होती. अनेक तयार चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडून पडले होते कारण चित्रपटगृहे पूर्णतः बंद होती. अनेक चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मार्ग निवडला परंतु काही चित्रपटांचा आवाका एव्हडा मोठा असतो की त्यांची लज्जत चाखायला मोठ्या पडद्यांचीच गरज असते. त्यातीलच एक म्हणजे रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’, जो त्याच्या ‘कॉप युनिव्हर्स’ मधील अजून एक चित्रपट. सिंघम आणि सिम्बानंतर रोहित शेट्टी ने ‘सूर्यवंशी’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हा चित्रपट मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता आणि त्याच्या ट्रेलर ने चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढविली होती. परंतु त्याच सुमारास कोविड १९ ही महामारी आली आणि संपूर्ण जगाबरोबर भारतातही लॉकडाऊन लागला.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास

मध्यंतरीच्या काळात कोरोना परिस्थिती सुधारताना दिसत होती आणि त्यानुसार ‘सूर्यवंशी’ सिनेमागृहांत प्रदर्शनाची तयारी करीत होता. जवळपास चारदा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर काही राज्यांमध्ये चित्रपटगृहे उघडली गेली होती परंतु महाराष्ट्रात ती बंद होती. काही चित्रपटांनी तरीही रिलीज होणे पसंद केले परंतु महाराष्ट्रातून, आणि खासकरून मुंबईतून, बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई होत असते म्हणून अनेक निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित केले नाहीत. महाराष्ट्रातील सिनेमागृहे उघडण्याची वाट पाहणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘सूर्यवंशी’ आघाडीवर होता. ऑक्टोबर २२ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे, काही निर्बंधांसह, उघडण्यात आली आणि ‘सूर्यवंशी’ ने दिवाळी चा मुहूर्त निवडला.

  • #Sooryavanshi [Week 2] crosses ₹ 150 cr... Records EXCELLENT NUMBERS on [second] Sun... If it maintains the consistency on weekdays and Weekend 3, there's a strong chance of going past ₹ 200 cr mark... Fri 6.83 cr, Sat 10.35 cr, Sun 13.39 cr. Total: ₹ 151.23 cr. #India biz. pic.twitter.com/wWx7O4SIYC

    — taran adarsh (@taran_adarsh) November 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खरंतर ‘सूर्यवंशी’ हा खूप मोठा चित्रपट समजला जात होता आणि त्याच्या प्रदर्शनाकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे डोळे लागले होते. कोरोना आघात, लोकांची कमी झालेली मिळकत, महामारीची भीती आणि ओटीटी ची लागलेली चटक यामुळे सिनेगृहात प्रेक्षक कितपत येईल अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. तसेच तिकीटविक्रीमार्फत चित्रपटांना किती परतावा मिळेल याकडे देखील इतर निर्मात्यांचे लक्ष होते. परंतु आता चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे याचे कारण म्हणजे ‘सूर्यवंशी’ ने पहिल्या विकेंडलाच १०० कोटींचा पल्ला पार केला.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास
‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास

अक्षय कुमारची ॲक्शन आणि कॉमेडी, कॅटरिना कैफचे मादक सौंदर्य आणि तिची अक्षयसोबतची तुफान केमिस्ट्री, अजय देवगणची धमाकेदार एन्ट्री आणि ॲक्शन व रणवीर सिंगची मसालेदार कॉमेडी या मिश्रणाबरोबरच रोहित शेट्टीचे गाड्या उडवत केलेले अप्रतिम दिग्दर्शन यामुळे ‘सूर्यवंशी’ सुपरहिट ठरला आहे. पहिल्या दिवशी ३४.३९ कोटी, दुसऱ्या दिवशी ३२.४३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३४.८४ कोटी रुपयांची कमाई झाली. एकंदरीत पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवरील कमाई 120.66 कोटी इतकी होती. दुसऱ्या आठवड्या अखेरीस ही कमाई 30. 57 कोटी झाल्याचे तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे. या चित्रपटाने आजवर 151. 23 कोटींची कमाई करीत 2021 मध्ये एक नवा विक्रम स्थापन केला आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास
‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास

हे आकडे डोळे विस्फारणारे असून सर्व निर्माते खुशीत आहेत. हा चित्रपट रोहित शेट्टी पिक्चर्स, रिलायन्स एंटरटेन्मेन्ट, धर्मा प्रॉडक्शन्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स या बॅनर्सखाली बनविण्यात आला असून जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोव्हर, अभिमन्यू सिंग, निहारिक रायझादा, विवान भाटेना, सिकंदर खेर, निकितेन धीर आणि जावेद जाफरी यांच्यादेखील यात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास
‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास

थोडक्यात अपेक्षेनुसार रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांत खेचून आणले असून ही चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणी सॅम डिसोझाची मुंबई पोलीस Sit कडून चौकशी

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.