ETV Bharat / sitara

सुपरस्टार शाहरुख खान म्हणाला होता... आर्यन ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल - Shah Rukh Khan

सुपरस्टार शाहरुख खान म्हणाला होता की, ‘आर्यनला मी सांगितले आहे की, तू लवकरात लवकर मुलींना डेट करावे. इतकं की मुलींच्या पालकांच्या माझ्याकडे तक्रारी यायला हव्यात, तू कितीही जणींबरोबर सेक्स करू शकतोस, तू नशा करू शकतोस अगदी ड्रग्जसुद्धा घेऊ शकतोस. ज्या गोष्टी तरुणपणात मी करू शकलो नाही. त्या तू बिनदिक्कत कराव्यास असा माझा सल्ला आहे. "तू ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल.”

Superstar Shah Rukh Khan fell short in aryan's rearing?
सुुपरस्टार शाहरुख खान आर्यनच्या संगोपनात पडला कमी?
author img

By

Published : Oct 4, 2021, 4:18 PM IST

Updated : Oct 4, 2021, 4:43 PM IST

मुंबई - भारतीय संस्कृतीमध्ये मुलांनी चांगली व्यक्ती होण्यासाठी कुटुंबावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. घरांमध्ये जे संस्कार होतात, त्यानुसार बहुतांश मुले समाजात वावरत असतात. मुलांना ‘चांगले’ व्हावे याचे बाळकडू आई-वडील, कुटुंबीय यांच्याकडून मिळत असते. परंतु, जर का मुलाचे आई-वडीलच आपल्या मुलाने ‘वाईट’ माणूस बनावे असे ठरविले तर? असेच काहीसे घडलाय शाहरुख खानच्या बाबतीत. नुकतेच त्याच्या मुलगा आर्यन खानला एनसीबी (NCB)ने ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक केली असून त्याला एक दिवसाची NCB कोठडी मिळाली. मोठमोठ्या सेलिब्रिटीजची मुले ड्रग्जचे सेवन का करतात हा सामाजिक प्रश्न असून त्यावर आजपर्यंत तोडगा निघालेला होता.

"तू ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल”

तर शाहरुख खानच्या बाबतीत सांगायचे तर त्याचा २४ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय. तो आणि त्याची बायको सिमी ग्रेवालच्या शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते आणि त्यात आपला मुलगा आर्यन बद्दल सांगताना शाहरुख म्हणाला होता की, ‘आर्यनला मी सांगितले आहे की तू लवकरात लवकर मुलींना डेट करावे इतकं की मुलींच्या पालकांच्या माझ्याकडे तक्रारी यायला हव्यात, तू कितीही जणींबरोबर सेक्स करू शकतोस, तू नशा करू शकतोस अगदी ड्रग्जसुद्धा घेऊ शकतोस. ज्या गोष्टी तरुणपणात मी करू शकलो नाही. त्या तू बिनदिक्कत कराव्यास असा माझा सल्ला आहे. "तू ‘बॅड बॉय’ झालेला मला नक्की आवडेल.” या वक्तव्याला त्याची पत्नी गौरीने सुद्धा दुजोरा दिला होता की शाहरुखने आर्यनला खरोखरच असे सांगितले आहे. तसे बघायला गेले तर शाहरुख कदाचित ‘ब्लॅक ह्युमर’मध्ये हे बरळला असेल परंतु, इंटरनेटच्या जमान्यात लोक जुन्या गोष्टी उकरून, खोदून काढून त्यावरून ट्रोल करीत असतात.

'आर्यन ‘चांगल्या’ मुलासारखा वागू लागला तर...'

गेल्यावर्षी सुशांत सिंग राजपूतच्या अकाली आणि वादग्रस्त निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून मोठा वाद रंगला होता. सामान्य जनता बॉलिवूडमधील ‘मोठ्या’ घराण्यांवर रागावली होती आणि आगपाखड करीत होती. त्या मृत्यूच्या तपासादरम्यानच बॉलिवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन आढळून आले होते आणि अजूनही त्याचा तपास सुरु आहे. आर्यन खान ‘नेपोटिझम’ च्या पंक्तीत बसतो कारण त्याचे वडील शाहरुख खान आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर क्रूज ड्रग्ज प्रकरणात अडकल्याचा आरोप आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या वक्तव्याची चर्चा होत आहे, ज्यात त्याने (कदाचित) विनोदाने म्हटले की त्याच्या मुलाने भरपूर ड्रग्ज आणि सेक्सचा अनुभव घ्यावा. सिमीच्या शोमध्ये शाहरुख (अभिमानाने) असेही म्हणाला होता की, ‘जर का आर्यन ‘चांगल्या’ मुलासारखा वागू लागला तर मी त्याला घराबाहेरचा रस्ता दाखवीन.”

शाहरुख मुलाच्या संगोपनात कमी पडला?

क्रूझ-ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमीचा, नुपूर सारिका, इश्मीत सिंग, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, मोहक जसवाल यांना अटक केली असून त्यांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळेच प्रश्न हा आहे की, भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध जात शाहरुख खान आपला मुलगा आर्यनच्या संगोपनात कमी पडला का? असा सवाल सध्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खानसह सर्व आरोपी किल्ला कोर्टात दाखल, कोठडी वाढणार

Last Updated : Oct 4, 2021, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.