बहुप्रतीक्षित ब्लँक चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय. सनी देओल आणि नवोदित चेहरा करण कपाडिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बेहजाद खंबाटा यांनी केलंय. ३ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.
ब्लँक चित्रपटाची कथा थरारक आहे. एका दहशतवादी संघटनेला भारतात हल्ला करायचा असतो. यासाठी मानवी बॉम्ब पाठवला जातो. त्याला काहीच आठवत नसते. एका अपघातात तो इन्टिलिजन्सच्या हाती लागतो. त्याला मारुन टाकण्याचा निर्णय होतो. मात्र त्याच्या मार्फत मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात सनी देओल यशस्वी होतो का याचा उलगडा ३ मेला होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपटाची कथा दमदार वाटत असून अॅक्शनचा भरपूर भरणा यात आहे. कर्तव्य जपणारे अधिकारी यशस्वी होतील की दहशतवादी आपल्या कारवाया करण्यात यशस्वी होतील हे सिनेमा पाहूनच कळेल. सनी देओलच्या चाहत्यांसाठी ब्लँक म्हणजे पर्वणी ठरु शकते.