ETV Bharat / sitara

सुहाना खानने अनन्या पांडे आणि शनाया कपूरसोबत बिकिनीत पूलमध्ये केली मजा मस्ती - Ananya Pandey latest news

सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि अबराम खान यांचा एक नवीन व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. यात ते सर्वजण स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.

सुहाना खान
सुहाना खान
author img

By

Published : Mar 9, 2022, 2:59 PM IST

मुंबई - शाहरुख खानचे कुटुंब गेल्या वर्षाच्या अखेरीस अतिशय कठीण प्रसंगातून गेले. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबावर कठीण प्रसंग दुदरला होता. त्यावेळी किंग खानला कुटुंबासाठी एक दिवस काढणे कठीण झाले होते. 'मन्नत'मध्ये पुन्हा एकदा आनंद परतला आहे. शाहरुखसह त्याचे संपूर्ण कुटुंब आता सोशल मीडियावर सक्रिय झाले असून शाहरुखनेही आपले काम सुरू केले आहे.

आता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना सोशल मीडियावर दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता या भागामध्ये सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि अबराम खान यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते सर्वजण स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.

पूलमध्ये सुहाना, अनन्या आणि शनाया यांच्या बोल्ड स्टाइलने चाहत्यांना वेड लागत आहे. महिला दिनानिमित्त हा व्हिडिओ शनाया कपूरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे तीन स्टार किड्स बिकिनी घालून पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. त्याचवेळी चाहते या तिन्ही सेलिब्रिटींचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा - शाहरुखच्या सुंदर लूकने वाढवली पठाणबद्दलची उत्सुकता पाहा फोटो

करण जोहरने शनाया कपूरला 'बेधडक' या आगामी चित्रपटातून लॉन्च करायचे ठरवले आहे. त्याच वेळी सुहाना खान चित्रपट निर्मात्या झोया अख्तरच्या कार्यालयात दिसली होती. तर अनन्याने यापूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

सुहाना खानबद्दल बोलले जात होते की ती झोया अख्तरच्या सध्याच्या प्रोजेक्ट 'आर्चीज'मध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर देखील अभिनयाच्या दुनियेचे दार ठोठावणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सुहाना खान अलीकडेच आयपीएल मेगा ऑक्शन 2022 इव्हेंटमध्ये भाऊ आर्यन खानसह तिच्या टीम केकेआरसाठी क्रिकेट खेळाडू खरेदी करताना दिसली होती.

हेही वाचा - रणबीर श्रद्धाने लव रंजनच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पुन्हा सुरू केले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.