मुंबई - बॉलीवुड एक्टर अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हे दोघेही काही दिवसापूर्वी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर पडताना दिसून आले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी फॅन्स चिंता व्यक्त करू लागले. मात्र नंतर माहिती समोर आली की, अमिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक बच्चन एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लीलावतीमध्ये उजव्या हातावर शस्त्रक्रिया पार पडली आहे.
तर आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की अभिषेकचा एक विचीत्र अपघात चेनईमध्ये शुटिंगच्यावेळी झाला होता. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आणि हात ठीक करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्यामुळे तो तातडीने मुंबईला परतला. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. आता तो चेन्नईला शुटिंगसाठी परत जाणार आहे.
आपली तब्येत बरी असल्याचे आणि पुन्हा शुटिंग सुरू करणार असल्याचे चाहत्यांना सांगताना त्याने अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग कोट केला आहे. मर्द को दर्द नही होता!! असे त्याने पोस्टच्या अखेरीस लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"गेल्या बुधवारी माझ्या नवीन चित्रपटाच्या सेटवर चेन्नईमध्ये एक विचित्र अपघात झाला. माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हात ठीक करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक होती! त्यामुळे तातडीने मुंबईला परतलो. शस्त्रक्रिया पार पडली, सर्व काही अलबेल आहे. आता चेन्नईला काम करण्यासाठी परत जाणार आहे. म्हणतात ना...द शो मस्ट गो ऑन!! आणि माझ्या वडिलांनी म्हटलंय...मर्द को दर्द नही होता!!" असे अभिषेकने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - राम गोपाल वर्माचे अभिनेत्रींना कवटाळत डान्स करतानाचे दोन व्हिडिओ व्हायरल!