मुंबई - प्रत्येक हृदयाच्या ठोका चुकवत बॉलिवूडची चांदणी म्हणेज श्रीदेवी यांची अचानक झालेली एक्झिट हा सर्वांसाठी मोठा धक्काच होता. त्याच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आजही त्यांच्या आठवणीत चाहतेदेखील भावुक होतात. आज त्यांचा जन्मदिन आहे.
श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही आपल्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जान्हीवीने पोस्ट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "हॅप्पी बर्थ डे मम्मा, मी तुला हरवलंय. प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठीच असते. मी तुझ्यावर प्रेम करते."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान बोनी कपूर यांनी लेखक धिरज कुमार यांच्या पोस्टला रिट्विट केले आहे. यात श्रीदेवींच्या आठवणीला उजाळा देण्यात आला आहे.
श्रीदेवी यांच्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
जितेंद्रसोबतच्या नात्याविषयी झाल्या होत्या चर्चा -
श्रीदेवी आणि जितेंद्र दोघांनीही 'हिम्मतवाला', 'जानी दोस्त' यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या या चित्रपटानंतर त्यांच्या आणि जितेंद्र यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, श्रीदेवींनी या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.
लग्नाआधीच होत्या प्रेग्नंट -
जितेंद्र यांच्यानंतर श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर यांची एन्ट्री झाली. त्यांचं नातं चांगलंच बहरलं होतं. त्या लग्नाच्या आधीच प्रेग्नंट राहिल्यामुळे बोनी कपूर यांनी त्यांच्याशी मंदिरात साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.
श्रीदेवी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर बोनी यांनी त्यांची पहिली पत्नी मोना यांच्यापासून वेगळे झाले. त्यांना पहिला मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला देखील होते.
पुढे श्रीदेवींनी जान्हवी आणि खुशी यांना जन्म दिला
हेही वाचा -‘अलबत्या गलबत्या’चा सेट चोरल्याचा श्रेयस तळपदेवर आरोप, राहुल भंडारेंना श्रेयसने दिले सडेतोड उत्तर