नवी दिल्ली - बॉलिवुड अभिनेता सोनू सूद हे एक असे नाव आहे, ज्या नावाला आज संपूर्ण देश ओळखतो. लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी केलेल्या कार्यानंतर त्यांना 'मसीहा', 'भगवान', 'अन्नदाता' यांसारख्या अशा अनेक नावांनी ओळखले जाऊ लागले. आज सोनू सूद यांचा 48वा जन्मदिवस आहे. या खास दिवसाला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत केक कापून साजरा केला. ईटीव्ही भारतने सोनू सूदच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
सोनू सूद यांचा जन्म 30 जुलै 1973ला पंजाबच्या मोगामध्ये झाला. त्यांच्या वडीलांचे 'बॉम्बे क्लॉद हाउस' नावाने कपड्यांचे दुकान होते. सोनू यांनी नागपुरमधून इलेक्ट्रॉनिक्स या विषयात इंजीनिअरिंग केली. त्यांना अभिनेता व्हायचे होते. यामुळे ते मुंबईला आले. त्यावेळी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मात्र, कसेतरी ते आपली उपजीविका भागवत होते.
तेथे ते तीन जणांसोबत एकाच रुममध्ये राहत होते. त्यांनी चित्रपटांमध्ये आपले एक स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला. सोनू सूदने फक्त 21व्या वर्षी मैत्रिण सोनालीशी लग्न केले. लग्नानंतरही त्यांना अनेक वर्ष त्यांना चित्रपटांसाठी संघर्ष केला.
![happy birthday sonu sood](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12616897_soni.jpg)
अनेकांना माहिती नसेल की सोनू सूद यांना चित्रपट क्षेत्रात येऊन किती वर्ष झाले असतील. मात्र, त्यांना सांगावेसे वाटते की, मागील दोन दशकांपासून (20 वर्ष) सोनू अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वर्ष 1999मध्ये तमिळ चित्रपट 'कालाझागर' या माध्यमातून केली होती.
![Sonu Sood celebrates 48th birthday](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12616897_soniasaf.jpg)
तमिळ आणि तेलुगू चित्रपटात डेब्यु केल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत 'शहीद ए आजम'द्वारे डेब्यु केला. यानंतर त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सोनू यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'पृथ्वीराज' आहे.
जेव्हा देशांत कोरोना महामारीचे संकट आले. तेव्हा सोनू यांनी अनेकांना मदत केली. त्यांनी लॉकडाऊन काळात फक्त प्रवासी मजदूरांनाच नव्हे तर त्यानंतरही अनेक गरजूंना मदत केली. कुणाला नोकरी तर कुणाला घर, कुणाला पुस्तके तर कुणाला करिअर यांसारख्या अनेक प्रसंगात त्यांनी गरजवंतांना मदतीचा हात दिला. सोनू ने कोरोनाकाळात असंख्य लोकांना मदत केली. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांचे लाखो चाहते त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहेत.