मुंबई - पार्श्वगायक सोनू निगमने नुकतंच एका अभिनेत्याचे नाव न घेता त्याच्यावर पावर प्लेचा आरोप केला होता. सोबतच म्युझिक इंडस्ट्री ही एखाद्या माफियाप्रमाणे चालवली जात असल्याचे त्यानं म्हटलं होतं. यानंतर गायकाने आता टी सीरिजचे चेअरमन आणि एमडी भूषण कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
सोनू निगमने सोमवारी सकाळी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हीडिओ शेअर केला. याला त्यानं कॅप्शन दिलं, 'लातों के माफिया बातों से नहीं मानते'. या व्हीडिओत सोनू म्हणत आहे, भूषण कुमार आता तर तुझं नाव घ्यावंच लागेल मला आणि आता तू तू म्हणण्याच्याच लायकीचा आहेस. तू चुकीच्या माणसाच्या नादी लागला आहेस.
गायक सोनू निगम म्हणाला, तू विसरलाय ती वेळ, जेव्हा तू माझ्या घरी येऊन म्हणायचा भाई भाई माझा अल्बम कर. भाई स्मिता ठाकरेंसोबत भेट घालून दे. बाळ ठाकरेंसोबत भेट घालून दे. अबू सलीमपासून वाचव. अबू सलीम शिव्या देत आहे. आठवतंय ना. आठवत आहे, की नाही या गोष्टी. मी तुला सांगतोय, माझ्या नादी नको लागू, आता बस.
मरिन कवर लक्षात आहे? ती का म्हणाली, त्याने का बॅकआऊट केलं मला नाही माहीत. मीडियाला माहिती आहे माफिया कशाप्रकारे काम करतात. त्याचा व्हीडिओ माझ्याकडे अजूनही आहे. आता जर तू माझ्या नादी लागला तर, तो व्हीडिओ यूट्यूबवर टाकेन, अशी धमकी सोनू निगमने भूषण कुमारला दिली आहे.