ETV Bharat / sitara

कनिका कपूरच्या बेजबाबदारपणावर भडकली 'ही' गायिका, व्यक्त केला संताप

author img

By

Published : Mar 21, 2020, 4:58 PM IST

कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. लंडनवरून परतल्यानंतर तिने सेल्फ आयसोलेशन न घेता पार्ट्यांमध्ये हजेरी लावली. त्यामुळे तिच्या बेजबाबदारपणावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

Sona Mohapatra angri on Kanika Kapoor Irresponsibility
कनिका कपूरच्या बेजबाबदारपणावर भडकली 'ही' गायिका, व्यक्त केला संताप

मुंबई - बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तिने स्वत: याबाबतची माहिती एका पोस्टद्वारे सर्वांना सांगितली आहे. लंडनवरून परतल्यानंतर तिने सेल्फ आयसोलेशन न घेता पार्ट्यांमध्ये हजेरी लावली. त्यामुळे तिच्या बेजबाबदारपणावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. आता गायिका सोना मोहापात्रानेही तिच्या अशा बेजबाबदारपणावर संताप व्यक्त केला आहे.

सोना मोहापात्रा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमी सामाजिक आणि राजकिय विषयांवर आपली मतं मांडत असते. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिनेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, कनिका कपूरच्या बेजबाबदार वागण्याचा तिला प्रचंड राग आला आहे. तिने याबद्दल ट्विटच्या माध्यमातून कनिकावर टीका देखील केली आहे.

  • Case in point, #KanikaKapoor hid her travel history after landing in #India (goddess knows how),attended events in Lucknow,Mumbai,went partying while staying in a 5 🌟& has the virus!So all of U giving me gyan about how ‘simplistic’ PM’s speech was,was it really?#WeThePeople 😑 https://t.co/k7SbFyNvr8

    — SONA (@sonamohapatra) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -COVID 19 - कनिका कपूर विरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल

तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की 'कोरोना विषाणू आणखी पसरेल. कारण, भारतात असे बेजबाबदार लोक राहतात जे सरकारकडून सर्व मागतात. मात्र, त्याबदल्यात ते स्वत: कोणतीही जबाबदारी पाळत नाहीत'.

  • & of course the netas & leaders who talk about ‘social distancing’ being the only way to combat the #coronavirus but themselves attending ‘parties’. Dushyant Singh,M.P & U.P health minister were with #KanikaKapoor ! Karnataka CM attended a wedding with another 2000 attending. 🙄 https://t.co/mqME2OBgV2

'याचे उदाहरण म्हणजे कनिका कपूर आहे. तिने भारतात आल्यानंतर स्वत:च्या प्रवासाची माहिती लपवली. लखनऊ येथे पार्ट्यांमध्ये सहभागी झाली', अशा शब्दांमध्ये तिने कनिकावर टीका केली आहे. सोनाच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा -कनिका कपूर लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.