नागपूर : शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जयवंतनगर येथील एका हॉटेलमध्ये एका २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली. सदर तरुणीला दुर्धर आजार होता आणि तीन दिवसापासून हॉटेलमध्ये राहत होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
काय आहे घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून तरुमी जयवंतनगरात असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. येथे खोली भाड्याने घेताना तिचा एक मित्र सोबत होता. तो नागपूर येथीलच असून, दररोज तिला भेटायला येत होता. आज ती बराचवेळ खोलीतून बाहेर आली नाही किंवा कशाची मागणी केली नाही. यामुळे तेथील वेटरने तिच्या खोलीचे दार ठोठावले परंतु तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. याची माहिती हॉटेलमधील व्यवस्थापकाला दिली. दरम्यान, त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असताना, त्यांना तरुणी मृत अवस्थेत आढळून आली.
मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला : मृतदेहाच्या बाजूला काही इसीजी रिपोर्ट आणि वैद्यकीय तपासणीचे कागदपत्रही पडलेले आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची अजनी पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ हॉटेल गाठून निरीक्षण केले व सर्व कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामा करीत, मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तो मित्र कोण? : पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. तरुणीला वडील नसून आईने दुसरे लग्न केले. त्यामुळं तरुणी तिच्या आत्या आणि मोठ्या वडिलांकडं राहायची. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ती तरुणी हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. तिला दुर्धर आजार होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. तिला हॉटेलात खोली भाड्याने घेऊन देणारा मित्र कोण? याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी अजनी पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा -