ETV Bharat / sitara

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका साधना सरगम ‘इंडियन आयडल मराठी' च्या मंचावर! - संगीतकार कल्याणजी-आनंदजी

अजय-अतुल (Music Composer Ajay Atul) हे पहिल्यांदाच सांगीतिक रियालिटी शो 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) चे परीक्षक बनले आहेत. यावेळच्या एपिसोड्समध्ये गायिका साधना सरगम (Singer Sadhana Sargam) हजेरी लावणार आहे.

Indian idol marathi
Indian idol marathi
author img

By

Published : Dec 17, 2021, 8:05 AM IST

मुंबई - ख्यातनाम संगीतकातद्वयी अजय-अतुल (Music Composer Ajay Atul) हे पहिल्यांदाच सांगीतिक रियालिटी शो 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) चे परीक्षक बनले आहेत. सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर हा कार्यक्रम सुरू झाला आणि प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. यातील स्पर्धक रसिकांच्या कौतुकास पात्र ठरताहेत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे.

इंडियन आयडल मराठी
दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम (Singer Sadhana Sargam) यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत. संगीतकार बंधू जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्या तालमीत गायिका साधना सरगम तयार झाल्या. त्यांनी आत्तापर्यंत ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
ऐंशीच्या दशकात त्यांची गाणी झाली प्रसिध्द
१९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'विधाता' या चित्रपटातली 'सात सहेलियां खडी खडी' हे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’ या गीताने ९० च्या दशकात धूम केली होती. हे गीत गाणाऱ्या साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधना या मराठी मुलीने तब्बल ३४ भाषांत गीतं गायली. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत प्रत्येकानी त्यांचं कौतुक केलं. उदित नारायण यांच्याबरोबर 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम या 'इंडियन आयडल मराठी' या मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.