मुंबई - बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोनाची चाचणी अखेर निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातून डस्चार्ज देण्यात आला आहे. कनिकाच्या यापूर्वी चार टेस्ट कोरोना पॉझिटिव्हच आल्या होत्या. मात्र, शनिवारी तिची पाचवी टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्ही एकदा तिची सहावी टेस्ट करण्यात आली. ती देखील निगेटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
-
Singer Kanika Kapoor has been discharged from Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow after the report of her sixth test, came negative. (file pic) pic.twitter.com/LpWEuHyLls
— ANI UP (@ANINewsUP) April 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Singer Kanika Kapoor has been discharged from Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow after the report of her sixth test, came negative. (file pic) pic.twitter.com/LpWEuHyLls
— ANI UP (@ANINewsUP) April 6, 2020Singer Kanika Kapoor has been discharged from Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow after the report of her sixth test, came negative. (file pic) pic.twitter.com/LpWEuHyLls
— ANI UP (@ANINewsUP) April 6, 2020
कनिकावर लखनऊच्या संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. येथील वैद्यकिय अधिकारी प्रोफेसर आर.के. धीमान यांनी सांगितले की, कनिकाचे रिपोर्टस आता निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे घरी जाण्यापर्वी पुन्हा एकदा तिची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, कनिकाला जरी घरी जाण्याची परवानगी मिळाली, तरी तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. कारण, कोरोना विषाणूचे निदान होण्यापूर्वी ती लंडनवरुन भारतात परतली होती. त्यानंतर तिने सेल्फ आयसोलेशन न करता पार्ट्यामध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे तिच्या विरोधात सरोजनी नगर पोलीस स्टेशनमध्ये कलम १८८, २६९ आणि २७० नुसार कनिकाविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
कनिका कपूर ही कोरोनाची लागण झालेली पहिली बॉलिवूड सेलेब्रिटी होती. ९ मार्च रोजी ती लंडनवरून भारतात परतली होती.