ETV Bharat / sitara

सिद्धांत चतुर्वेदी, मालविका मोहननची भूमिका असलेला 'युद्ध्रा'ची अ‍ॅक्शन-पॅक टीझरद्वारे घोषणा - फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी

गल्ली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी 'युध्रा'मध्ये मालविका मोहनन हिच्यासह हार्ड-कोर अ‍ॅक्शन आणि रोमान्स चित्रपटासाठी सज्ज आहे.

Yudhra
युद्ध्रा
author img

By

Published : Feb 15, 2021, 6:53 PM IST

मुंबई - अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'युद्ध्रा' चित्रपटाची घोषणा एका अ‍ॅक्शन पॅक व्हिडिओसह करण्यात आली आहे. २०२२ मध्ये या चित्रपटाचे रिलीज होणार आहे.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट या बॅनरखाली सिध्दांत पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झालाय. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'गली बॉय' या चित्रपटासह या निर्मात्यांसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सिध्दांत याच बॅनरद्वारे निर्मित 'फोन भूत'मध्येही काम करणार आहे.

चित्रपटाची घोषणा करत निर्मात्यांनी२०२२ मध्ये प्रदर्शित होणार्‍या 'युद्ध्रा'चे पोस्टर्स आणि टीझर रिलीज केले. सोशल मीडिया हँडलवरुन एक्सेल एंटरटेनमेंटने पोस्ट केले, "करने सबका गेम ओवर, आ रहा है # 'युद्ध्रा'चे रिलीजिंग, समर २०२२."

कसीम जगमागिया सह-निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा फरहान अख्तर आणि श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. लेखक संवाद घिल्डियाल याच्यासह फरहान अख्तर यालाही त्यांच्या संवादांचे श्रेय जाते. रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून युध्राचा विचार होत आहे.

यापूर्वी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले श्रीदेवीच्या 'मॉम' या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि उदयवार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हेही वाचा - ‘लूप लपेटा’च्या सेटवर तापसी पन्नूची अनोखी ‘आत्मनिर्भरता’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.