ETV Bharat / sitara

विकी कौशलच्या ‘अश्वत्थामा’ चित्रपटाच्या चित्रीकरणास पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार सुरूवात - आदित्य धार दिग्दर्शित करणार अश्वथामा

उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य धार यानेही आपल्या नवीन सिनेमाच्या शुटिंग डेटची घोषणा केली आहे. विकी कौशलसोबतच करत असलेल्या त्याच्या आगामी ‘अश्वत्थामा’ या सिनेमाच्या शुटिंगला तो येत्या एप्रिल २०२१ पासून सुरूवात करणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे.

Ashwatthama
अश्वत्थामा
author img

By

Published : Oct 9, 2020, 7:27 PM IST

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काहीशी थंड पडलेली सिनेनिर्मिती आता हळूहळू सुरू होत आहे. न्यू नॉर्मलचा नारा आळवत आता काही दिग्दर्शकांनी आपल्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सना हात घालण्याचा निर्णय घेतला आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धार यानेही आपल्या नवीन सिनेमाच्या शुटिंग डेटची घोषणा केली आहे. विकी कौशलसोबतच करत असलेल्या त्याच्या आगामी ‘अश्वत्थामा’ या सिनेमाच्या शुटिंगला तो येत्या एप्रिल २०२१ पासून सुरूवात करणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे.

आदित्य धारने त्याच्या महत्त्वाकांक्षी सिनेमा अश्वत्थामाची तयारी गेल्या काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास नेली आहे. कोरोना काळात बहुतांश निर्माते शुटिंग टाळत असताना त्याने मात्र लवकरात लवकर सिनेमाचं शुटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्यचा हा सिनेमा महाभारतातील अश्वत्थामा या चिरंजीव असलेल्या कॅरेक्टरभोवती आधारित आहे. तीन भागात बनणाऱ्या या सिनेमासाठी त्याने त्याचा मित्र विकी कौशल यालाच मुख्य भूमिकेसाठी निवडलेलं आहे.

या सिनेमासाठी विकीला पुष्कळ तयारी करावी लागणार आहे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. तो हॉर्स रायडिंगमध्ये पारंगत होता, त्यामुळं विकीला हॉर्स रायडिंगचं खास प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. याशिवाय त्याला कर्व मागा आणि जुजूत्सू यासारखे काही दुर्मीळ मार्शल आर्टचं प्रशिक्षण देखील घ्यावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकीला त्याचं वजन जवळपास १०० किलोपर्यंत वाढवावं लागणार आहे.

या सिनेमाचं शुटिंग रिअल लोकेशन्सवर होणार असल्याने त्याचं पहिलं शेड्युल युरोपमध्ये, त्यानंतर दुसरं शेड्युल आईसलँडमध्ये तर त्यानंतर तिसरं आणि अखेरचं शेड्युल मुंबईत पार पडणार आहे. असं असलं तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बदल करावा लागला तर त्यासाठी देखील दिग्दर्शक पूर्णपणे तयार आहे.

आदित्यने लॉकडाऊनचा पूर्ण उपयोग करून घेतला असून यादरम्यान त्याने या प्रोजेक्टसाठी लागणारे सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख ठरवून टाकले आहेत. त्यासोबतच सिनेमासाठी लागणारी व्हिएफएक्स तयार करण्यासाठी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा देखील सुरू केली आहे. महाभारतात घडणारी गोष्ट असल्याने त्यासाठी लागणारी लोकेशन्स काल्पनिक आहेत. त्यामुळे त्यातील बारीक सारीक तपशिलांवर व्हिएफएक्स टीमला फार बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे. या सिनेमात विकीच्या अपोझिट नक्की कोण अभिनेत्री दिसेल ते ठरलेलं असलं तरीही प्रत्यक्ष करार पूर्ण झाल्याशिवाय त्या अभिनेत्रीचं नावं सांगायला आदित्यने नकार दिला आहे. मात्र लवकरच ते नाव प्रेक्षकांना कळेल याची ग्वाही त्याने दिलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.